पितामह विष्णुपंत दादरे यांची ९३ वी जयंती व रक्तदान शिबीर उत्साहात

Loading

१०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे लोणारी समाजाचे जनक पितामह विष्णुपंत दादरे ( लोणारी ) यांची ९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित  रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी गेंड होते.

 कार्यक्रमास शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, नगरसेवक लक्ष्मण गोसावी, नगरसेविका शकुंतला मछले, नगरसेवक अशोक माळगे, पराग पाटील, माजी नगरसेवक अशोक कोळेकर, उत्तम वाघवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दादरे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

आमदार यड्रावकर यांनी लोणारी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक हाके यांनी लोणारी समाज हा कष्टकरी व प्रगतशील असून अनेक युवक प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याचे नमूद केले.कार्यक्रमात इयत्ता सातवीतील नंदिनी शिंदे हिने प्रभावी भाषण सादर केले, तर दहावीतील श्रवण धंगेकर याने ‘मी लोणारी लाजू कशाला’ ही कविता सादर केली.

यावेळी नगरसेवक बजरंग खामकर, गिरमल कोळी,सचिन निटवे, यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड,सागर माने,चंद्रकांत चव्हाण,फारुख कडबी,प्रल्हाद नरळे, संदीप धंगेकर,मधुकर काळेल सर,हनुमंत खिलारे सर,सतीश मलमे, नितीन माळी, सचिन डोंगरे,रोहिणी साबरेकर,प्रियांका धुमाळ, जयसिंगपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ.सुभाष सामंत, उपाध्यक्ष संदीप अडसूळ,कार्याध्यक्ष हुसेन शेख,सचिव संजय सुतार,सहसचिव रोहित जाधव,पत्रकार रतन शिकलगार,नामदेव भोसले,राजू इनामदार,सतीश मोटे त्याच बरोबर प्रेस क्लब चे सर्व सदस्य पत्रकार मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष महादेव हिप्परकर,खजिनदार विठ्ठल खोत,कार्याध्यक्ष रमेश धंगेकर, संचालक अर्जुन नरळे,संचालक विजय आटपाडकर,मुख्य सल्लागार महादेव नरळे,संचालक राजेंद्र हिप्परकर, संचालक राजेंद्र मुडलगी,संचालक कैलास मुंजे, संचालक सागर मुडलगी,लोणारी समाजातील या कार्यक्रमाला रात्र दिवस परिश्रम घेणारे युवक प्रशांत धंगेकर,अरुण गेंड,विनोद नरळे, तानाजी नरळे,शिवाजी नरळे,संतोष मुंजे,किरण लोणार,रामा नरळे,अजित खोत,महेश नरळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रभाकर माने यांनी केले.शेवटी विजय धंगेकर यांनी आभार मानले.