शुक्रवारपासून राजस्थानी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

 येथील मारवाडी युवा मंचच्या वतीने "राजस्थानी प्रिमियर लीग 2026", हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शुक्रवार 16 ते 18 जानेवारी दरम्यान आयोध्या मालू क्रीडानगरी येथे होणार आहेत.

अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट अध्यक्ष बहादुर बरडीया, माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दीपक बियाणी, जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ अध्यक्ष भरत भागरेचा, गायत्री विप्र सेवा मंडळ, जयसिंगपूर अध्यक्ष कैलासकुमार बोरा, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष आनंद बेदमुथा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजस्थानी प्रीमियर लीगचे यंदाचे 14 वे वर्ष असून या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ असून 100 खेळाडू यामध्ये सहभागी असणार आहे.यावर्षी पवन बरडीया हे राजस्थानी प्रिमियर लीगचे अध्यक्ष ,तर उपाध्यक्ष दिपक मालू ,सचिव म्हणुन कैलास बोरा यांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धा शहर मर्यादित असून मारवाडी समाजाच्या शहरातील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा, एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी स्पर्धा होत आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्योगपती संजय घोडावत, सुमेरमल बाफना व मेघराज बलदवा आहेत. तर सहप्रायोजक उद्योगपती विनोद घोडावत, डॉ. प्रविण जैन, कन्हैयालाल बलदवा, रमेश चौधरी, राजकुमार बलदवा आहेत. राजेंद्र मालू यांनी आयोध्या मालू क्रीडानगरी येथे क्रिकेट सामने आयोजित करण्यास विशेष सहकार्य केले आहे.