![]()
शिरोळ : प्रतिनिधी

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना ली. शिरोळ यांच्यावतीने इयत्ता 1ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखर शाळेतील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज यांच्यावतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. सदर साखर शाळेतील विद्यार्थी हे बीड जालना धुळे नंदुरबार विजापूर आधी भागातून ऊस तोडणी साठी आलेल्या मजुरांची मुले असतात. सदर विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी कारखान्यामार्फत साखरशाळा चालवली जाते. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश माधान्य भोजन खेळाचे साहित्य तसेच आरोग्य विषयक सेवा मोफत पुरवण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून सध्या हिवाळी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची थंडीपासून सुरक्षितता व्हावी या हेतूने दिनांक 11 डिसेंबर रोजी स्व डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहभागी असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज यांच्या वतीने ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. सदर ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम या क्लबच्या अध्यक्षा पद्मश्री शिरगावे सेक्रेटरी मनाली इंगळे व त्यांच्या सहयोगी योगिता सानिकोप,रसिका बनाजवाडे, स्मिता पाटील, स्मिता इंगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी या क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला त्यांना खूप अभ्यास करा चांगले शिक्षण घ्या तसेच आणखी कोणी आपले मित्र असतील तर त्यांना शाळेमध्ये घेऊन या असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यपिका वनिता कांबळे अध्यापिका अनिता देवकर तेजस्विनी पाटील यांनी इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन केले तर आभार सिविल इंजिनिअर यशवंत माने यांनी मानले. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, ओएस अशोक चौगुले, सुनील कदम आदी उपस्थित होते.