कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ५० लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन व अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा एकूण ५० लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत तर बौद्ध समाज रस्ता कॉंक्रिटीकरण व ख्रिश्चन समाज रस्ता कॉंक्रिटीकरण प्रत्येकी पाच पाच लाख रुपये आणि समगे गल्ली रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .त्याचबरोबर आंबी समाजाने व ग्रामपंचायतने गावातील पूर परिस्थिती उपयोगी ठरणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या होडीची मागणी केली होती . जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या होडीचे कृष्णा – वारणा संगमावर पूजन करण्यात आले . यावेळी आंबी कुटुंबीयांनी होडी बरोबरच कृष्णामाईचे ही पूजन केले .
होडी पूजनानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कृष्णा वारणा संगम परिसरात नौका विहार केले .
यावेळी स्वागत करताना संजय नांदणे म्हणाले,बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत होती .आता दुसरा मजला पूर्ण झाल्यास या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिकेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला .तसेच उर्वरित रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी ही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली .
हलगीच्या कडकडाटात आणि फटाके उडवून त्यांचा ग्रामपंचायत ,बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला .आमदार पाटील यांचे स्वागत करण्यात आले . यावेळी महिलांनी आमदार राजेंद्र पाटील यांचे औक्षण केले .
यावेळी देवगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे राजगोंडा पाटील भरत इसरांना विजय खवाटे ऋषभ पाटील भरतेश खवाटे भैरू हंकारे शरद कांबळे ,उल्हास पाटील,संदीप कांबळे ,विलास कोरवी शितल पाटील -धडेल ,राजू विभुते , उत्तम तिवडे – पाटील ,नितीन वायदंडे हिदायत नदाफ संदीप मोरे मयूर कांबळे आकाराम पुजारी भाऊसो पाटील दिलीप माळी रावसो आंबी बाबू आंबी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .