ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी देणारच : आमदार डॉ. यड्रावकर यांचे आश्वासन

Loading

टाकवडे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना ग्रामीण भागाला जास्तीत जास्त महत्त्व असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडूच देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. टाकवडे ता. शिरोळ येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. २६ कोटींच्या माध्यमातून टाकवडे गावचा कायापालट होत असून यापुढे देखील टाकवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. २० लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर मराठा समाज सांस्कृतिक हॉल साठी २० लाख रुपये मंजूर केल्याबद्दल मराठा समाज बांधवांच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक कन्या उर्दू शाळा बांधकामासाठी आमदार यड्रावकर यांच्या फंडातून १० लाखांचा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू असून गावा गावांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत अशी आपली भूमिका असल्याचे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले. तर गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल आणि या विश्वासाने प्रत्येक प्रकल्प, योजना आणि निधीचा योग्य वापर करून ग्रामीण जीवनमान उंचावणे, हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, उदय झुटाळ, यशवंत पाटील, सौरभ निर्मळ, अविराज पाटील, प्रतिक उर्फ बंटी पाटील, शकील शेख,नागेश काळे,रावसाहेब वाडगे,विक्रम घोरपडे, दिलीप झुटाल, विनायक करडे,उमेश देसाई, अनिल पाटीलपराप्पा,एम बी पाटील,दाऊद मुल्ला, बाबासो पाटील, दीपक कुलकर्णी, बंडू शेख,अबुबकर बरगीर,ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील, महेश पाटील,संतोष पाटील, निलेश पाटील,संभाजी माने, राहुल पाटील,गणेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.