![]()
विरोधकांची तारांबळ : उमेदवारांची जुळवाजुळव

जयसिंगपूर : प्रतिनिधी-
शहरातील अनेक राजकीय जाणकारांचे प्रभाग क्र.8 मध्ये लक्ष्य केंद्रित झाले आहे.या प्रभागात बहुजन सेवा संघांचे अध्यक्ष आणि इंजिनियर उत्तम वाघवेकर यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला वाघवेकर आणि माजी नगरसेवक पराग यांची उमेदवारी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर विकासाचे संकल्पक संजय पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडी कडून निश्चित मानली जात आहे. उज्वला वाघवेकर यांचा मागील पंचवार्षिक निवडणुकीत निसटता पराभव झाला होता.या वेळी त्यांच्याच प्रभागात निवडून येणारच असा कार्यकत्यांचा दावा आहे.आता यड्रावकर गटाचे उमेदवार निश्चित मानले जात असून मात्र त्यांना तोडीस उमेदवार कोण हेच समजेणासे झाल्याने विरोधकांची तारांबळ झाली आहे.यावेळी उज्वला वाघवेकरच निवडू येणार आणि आणायचे असे सुज्ञ मतदारांनी ठरवल्याचे दिसते. वाघवेकर या पती पत्नीने मतदारसंघाचा जनसंवाद दौरा केला असून त्यांना प्रतिसाद उत्तम आहे. उत्तम वाघवेकर आणि उत्तम प्रतिसाद हे या निवडणुकीत दिसणार आहे. हे नक्की.

माजी नगरसेवक पराग पाटील यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांचा पूर्वीचा प्रभाग जरी वेगळा असला तरी प्रभाग आठ मध्ये ते अनेक महिने कार्यरत आहेत.प्रभागातील अनेक सामाजिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात. आणि निवडणुक कशी जिंकायची याचे गणित त्यांना अवगत आहे. मितभाषी संयमी अशी त्यांची शहरात ओळख आहे.
या शहरात वाघवेकर कुटुंब एक मोठे कुटुंब आहे. त्यांच्या पै पाहुण्यात आणि घरात इतके मतदार आहेत परंतु या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळालाच नाही. जवळजवळ १९८९ पासून हे कुटुंब राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. बहुजन समाजासाठी जे करायचे ते करायचे असे उत्तम वाघवेकर बोलतात. मात्र बहुजन असे नाव बोलले की त्यांना त्यांच्याच प्रभागातील एक प्रस्थापित राजकारण करणारे का विरोध करतात हे कळेना. आता मात्र त्यांचा विजय निश्चित आहे. कारण कि जनता प्रस्थापितांना कंटाळली असून बदल पाहिजे आहे जनतेला. कोणतीही अडचण दूर करण्यासाठी राजकीय सत्ता लागते हे जनतेला कळाले आहे. म्हणून राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार या प्रभागात निश्चित मानले जात असून वाघवेकर आणि पाटील यांची आघाडी चमत्कार दाखवणार हे समजायला हवे. आता वाघवेकर आणि पराग पाटील यांचे कार्यकर्ते काय रणनीती आखतात यावरच या प्रभागाचे भवितव्य अवलंबून आहे.