![]()
मतदारांचा उत्तम प्रतिसाद : खमक्या कार्यकर्ता आणायचा नागरिकांची इच्छा!

जयसिंगपूर : प्रतिनिधी-
या शहरात गेली अनेक वर्षे लोकांची समस्या कोणत्याही पातळीवर जाऊन सोडवणारा एक कार्यकर्ता आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.गतवेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या मातोश्रीचा विजय थोडक्यात हुकला.10 तारखेपासून उमेदवारांना फॉर्म खरेदी आणि उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था निवडणूक विभागाची सुरु होत आहे.

आता खमक्या उमेदवार कोण याची चाचपणी लोक करीत आहेत.मात्र गेली अनेक वर्षे लोकांची समस्या कोणत्याही पातळीवर जाऊन सोडवणारा एक कार्यकर्ता या प्रभागात संतोष बाबुराव जाधवच आहेत.म्हणून त्यांच्याकडे राजकीय सत्ता पाहिजे असे या प्रभागातील लोकांचे मत आहे. म्हणून ते निवडून येणारच असा ठाम विश्वास नागरिकांना आहे.संतोष जाधव यांची जनसंवादाची पहिली फेरी पूर्ण झाली असून आता त्यांना मिळालेल्या जनतेच्या उत्तम प्रतिसादामुळे ते निवडणूक लढवतील आणि जिंकतील अशी अपेक्षा आहे. खमक्या कार्यकर्ता आणायचा नागरिकांची इच्छा आहे.
प्रभाग क्र. 7 मधून ते निवडणूक लढवावेत अशी या प्रभागातील लोक बोलत आहेत.
या प्रभागात गल्ली नंबर 12,13 शिवाजी हौसिंग सोसायटीचा अर्धा भाग आणि जयसिंगनगर,मच्छी मार्केट काडगे मळा असा भाग आहे. या भागातील करते धरते संतोषच आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते ते आहेतच पण प्रत्येकाच्या कोणत्याही समस्येला ते धावून जातात. असा कार्यकर्ता आजमितीला सापडत नाही. किंवा दिसतच नाही. या वर्षी त्यांनी प्रभागातीलच नाही तर जयसिंगपूर शहरातील जनतेसाठी एक मोठा कर्यक्रम घेतला होता. दहीहंडी हा युवकांना जागृत आणि एकत्रित करण्यासाठीचा कार्यक्रम झाला. जनतेचा त्यांना पाठींबा दिसत आहे. ते निवडून येणार हे नक्की. कारण की, साम, दाम, दंड आणि भेद ही रणनीती ते जाणतात.ते रिंगणात येऊच नयेत यासाठी राजकारण्याची धडपड सुरू असल्याची चर्चा प्रभागात आहे.
ते एक उत्तम नागरिक तर आहेतच पण त्याशिवाय राजकारणासाठी काय करावे लागते याची त्याना जाणीव आहे. या शहरातील कोणालाही पुरून उरेल असा व्यक्ती आहे. म्हणून तर त्यांना नगरसेवक करायची जनतेची इछा आहे. प्रसंगाला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख या शहरांत निर्माण करण्यात संतोष जाधव यशस्वी झाले आहेत याचा अनेक वर्षाचा जनतेला अनुभव आहे.म्हणून प्रभाग क्र 7 मधील जनता त्यांच्या पाठीशी राहणार हे नक्कीच.