सुनिल पाथरवट खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

सुनिल पाथरवट खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

Loading

जयसिंगपूर गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांचे संयुक्त यश

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील गल्ली नं 13 मध्ये काल बुधवारी पहाटे एकाचा निघृण खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अवघ्या १२ तासात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी या खुनातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपीना ताब्यात घेतले आहे.सुनील पाथरवट याचा खून झाल्यानंतर काल पहाटेपासून आज पर्यंत पोलिसांचे पथक संशयित आरोपींचा शोध घेत होते. याप्रकरणी शेखर महादेव पाथरवट वय 30, सागर परशुराम कलकुटगी वय 31 दोघे राहणार गल्ली नंबर 13, विजय लक्ष्मण पाथरवट वय 43 आणि संजय लक्ष्‍मण पाथरवट वय 47 राहणार डवरी सोसायटी जयसिंगपूर या चार संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकातील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक युनूस जमादार, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे अंमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला,महेश खोत, संजय कुंभार,रहीमान शेख, बाळासाहेब गुत्ते,कोळी लखन पाटील हंबीरराव माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.जुन्या वादाच्या कारणावरून संजय पाथरवट यांने मयत सुनील पाथरवट याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याला जिवंत सोडू नका अशी चितावणी दिल्याने रोहित पाथरवट आणि शिवानंद पाथरवट यांनी गच्च धरून ठेवले आणि शेखर पाथरवट व सागर कलगुटगी,विजय पाथरवट यांनी सुद्धा शिवीगाळ केली. सुनील पाथरवट याच्या पोटात आणि अंगावर चाकूने मारून जखमी केले.असे फिर्यादीवरून पोलिसांनी तपास केला.

 वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचा आदेश दिल्यानुसार जयसिंगपूर आणि कोल्हापूर पोलिसांनी तपास केल्यानुसार गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपींना चौंडेश्वरी फाटा परिसरातून सीताफिने ताब्यात घेतले.संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर गुन्ह्याची त्याने कबुली दिली आहे.उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *