![]()
- गुणवत्ता नियंत्रकांकडे तक्रार करणार
- डांबर कमी
- बांधकाम विभाग झोपेत
- चंदगड / तातोबा गावडा
कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेल्या राजगोळी ते तिरमाळ ग्रामा 85 या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. परंतु यामध्ये कमी डांबर वापरत असल्याने शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. तात्काळ दुरुस्ती करून योग्य डांबरीकरण झाले पाहिजे यासाठी ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून राजगोळी ते तिरमाळ हा रस्ता काम सुरू आहे. याची निविदा प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाले आहे. हा रस्ता करत असताना शासनाचे नियम पाळले नाहीत . तांत्रिक मान्यता मिळाल्याप्रमाणे काम झाले नसल्याची इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बांधकाम विभाग झोपेचे सोंग आणून यावर दुर्लक्ष करत असल्याने थेट गुणवत्ता नियंत्रकांकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या रस्त्याबद्दल वारंवार निदर्शनास आणून देखील आहे असेच काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता तर निकृष्ट होत आहे शिवाय शासनाचा 50 लाख रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. पावसामध्ये हा रस्ता उकडून जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या रस्ते डांबरीकरणासाठी निविदाच्या अटी शर्थी नुसार हे काम व्हाॅटमिक्सने करायचे होते परंतू अधिकारी यांना हाताशी धरून डांबरामध्ये काळा बाजार केला आहे. तसेच कामगार वापरून कमी डांबर टाकण्याचे काम होत आहे. कार्यकारी अभियंता यांनी या कामाशी चौकशी करून संबंधित ठेकेदाराला पुन्हा नव्याने डांबर टाकण्यात सांगावे अन्यथा हे प्रकरण लोकायुक्तांपर्यंत पोहोचेल अशी माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली.




