![]()
डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशन शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
हातकणंगले : प्रतिनिधी :-
शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या ज्ञानामुळे समाज शिक्षित होतो, संस्कारामुळे सुसंस्कृत होतो आणि प्रेरणेमुळे प्रगतिशील बनतो. म्हणूनच शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान देत नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घालतो. समाजाच्या जडणघडणीसाठी शिक्षण जितके आवश्यक आहे, तितकेच शिक्षकांचे योगदानही अमूल्य आहे असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले ते कुंथूगिरी येथे डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की राजकीय पद असताना सगळेच कार्यक्रम घेतात पण पदावरती नसताना देखील डॉ. सुजित मिणचेकर यांनी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अन्य विविध उपक्रमातून समाजकार्य सुरू ठेवले आहे. ते खरोखरच कौतुकास्पद आहे. यावेळी विशेष शिक्षण रत्न म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे भिकाजी कासार यांना पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर प्राथमिक विभागातून 11 व माध्यमिक विभागातून 14 शिक्षकांना तसेच तीन आदर्श शाळा व एक आदर्श हायस्कूल असे एकूण 30 पुरस्कार यावेळी वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, मंगेश चिवटे, अरुणराव इंगवले, माजी अर्थ शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, अजित सुतार, लेखा मिणचेकर, सार्थ मिणचेकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर, रणजीत मिणचेकर, स्वरूपा शेलार, विशाल साजणीकर, शशी मिणचेकर, रमेश कांबळे, अरविंद खोत, विजय भोसले, योगेश चौकाककर, वृषभ पाटील, बाळासाहेब कांबळे, महावीर कांबळे, गोरख कांबळे, इंद्रजित मिणचेकर, पिंटू मुरूमकर, डॉ. प्रदीप पाटील, किसन तिरपणकर, शामराव गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पोवार, सूत्रसंचालन समाधान सासणे व सौ शिंदे मॅडम यांनी केले. तर आभार फौंडेशनचे सचिव राकेश खाडे यांनी मानले.


