प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी संवेदनशीलतेने काम करा

Loading

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रशासनाला सूचना

जयसिंगपूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बेघर कुटुंबाला घर मिळालेच पाहिजे. ही योजना प्रत्येक कुटुंबाच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी निगडित जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थायी निवारा असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी समर्पणाने आणि संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केल्या.
शिरोळ तालुक्यातील कवठेसार, दानोळी, कोथळी, उमळवाड, अर्जुनवाड व घालवाड या गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आमदार यड्रावकर यांनी संबंधित गावांतील घरकुल योजनेची सद्यस्थिती, मंजूर लाभार्थ्यांची प्रगती, तसेच अंमलबजावणी दरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले की, ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अडथळे समजून घेऊन जास्तीत जास्त पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे.
यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यड्रावकर यांनी घरकुल योजनेव्यतिरिक्त तालुक्यातील प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला व संबंधित विभागांना ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजना मिळण्यात अडचणी येत असल्यास, त्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. प्रधानमंत्री आवास योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे समान ध्येय असले पाहिजे. एकही पात्र नागरिक घरकुलाविना राहू नये, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
या बैठकीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप तसेच ग्रामसेवक व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेबाबत ग्रामस्थांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून, ग्रामीण भागातील ‘घरकुल स्वप्न’ साकार करण्यासाठी आमदार यड्रावकर सक्रिय पावले उचलत आहेत. या प्रसंगी कवठेसार येथे सरपंच पोपट भोकरे,उपसरपंच ऋषभ मगदूम,संतोष किनीकर,बशीर फकीर, बाबासो मगदूम,रमेश मगदूम,विजय नांद्रेकर,वसंत गुरव,बाळासो कुरणे, भरत तेरदाळे,संतोष भोकरे,दीपक भोकरे,सुशांत माने,मौला लतिफ, दानोळी येथे सरपंच सुनीता वाळकुंजे,उपसरपंच मंगल दळवी,पैलवान केशव राऊत, धन्यकुमार उर्फ पिटू पाराज,डी.ए. पाटील,अनिल दळवी,विकास वाळकुंजे,परेल सावंत,राजू शिंदे,विजय दळवी,उमेश केतवे,
उमळवाड येथे सरपंच छाया कर्वे उपसरपंच अनिता तिवडे,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, राजगोंडा मगदूम,मिलिंद मगदूम, विद्याधर कर्वे,प्रभाकर चौगुले, यांच्यासह गावातील विविध संस्थांचे संचालक व ग्रामस्थ तसेच कोथळी
सरपंच सुजाता बोरगावे,उपसरपंच वासंती पाटील,सदस्य नितीन वायदंडे, विजय खवाटे,विलास कोरवी,हिदायत नदाफ,राजेश विभूते यांच्यासह भिमगोंडा बोरगावे,देवगोंडा पाटील, संजय नांदणे,दिलीप मगदूम,रावसो विभुते,सागर बोरगावे,रावसो बोरगावे, राजेंद्र नांदणे,रवी पुजारी,सनी मगदूम अर्जुनवाड येथे सरपंच अर्चना थोरात,उपसरपंच विकास पाटील,सदस्य संतोष पाटील,परेशराम बागडी,संगीता चौगुले,नंदाताई खोत, डोंगरे वहिनी,भारती परीट यांच्यासह नंदकुमार पाटील,प्रदीप चौगुले, चंद्रकांत गंगधर,अशोक चौगुले,अशोक चौगुले(शिरोटे),संदीप खोत,कुमार कोळी घालवाड येथे सरपंच सुहास खाडे,उपसरपंच अभिलाष कांबळे,सदस्य प्रतिभा जाधव,जयश्री फडतरे,प्रतिभा परीट, दीपा थोरवत,गणबावले वहिनी यांच्यासह रामचंद्र कोगनोळे,नामदेव थोरवत,अजित थोरवत,कृष्णदेव इंगळे,प्रताप नाईक,इंद्रजीत सरनोबत, भगवान खोंद्रे,मदन मस्के,परशुराम खराडे, जयसिंग खोंद्रे यांच्यासह गावातील नागरीक, पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *