![]()
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रशालेत माहिती सादर करीत प्रतिज्ञा उपक्रम

आजरा : प्रतिनिधी
ग्रीन डे व अर्थ मिनिट निमित्त शासनाच्या आदेशानुसार येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रशालेत माहिती सादर करीत प्रतिज्ञा करीत प्रभात फेरी काढण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.याची जाणीव एस.वाय.भोये यांनी करून दिली.तर प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर यांनी पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे असे बोलून जवळच्या अंतरापर्यंत शक्यतो चालत जाणे,दूरच्या पल्ल्यासाठी शक्य तितक्या वेळेला एसटी बस अशा मोठ्या वाहनांचा प्रवासासाठी वापर केला पाहिजे,सायकलचा वापर करणे अंगीकृत केले पाहिजे असे आवाहन करीत त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.शक्य तितक्या प्रमाणात विजेचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज आहे असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तर “मी आज “ग्रीन डे”निमित्त पयार्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्याची प्रतिज्ञाकरतो / करते. मी शक्य तितक्या वेळा सायकल,पायी चालणे व सार्वजनिक वाहनांचा वापर करीन,मी वीज,पाणी व कागदाचा वापर काटकसरीने करीन,मी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित ठेवीन,मी माझ्या सहकाऱ्यांनाही पयार्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करीन,मी पृथ्वीच्या संरक्षणासाठी जबाबदार नागरिक म्हणून सदैव योगदान देण्याचा संकल्प करतो/ करते.अशी प्रतिज्ञा एन.सी.सी.ऑफिसर एम.एस.पाटील यांनी करून घेतली.यानंतर विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण पूरक फलक घेऊन आजरा शहरांतुन प्रभात फेरी काढली आणि घोषणा देत जनजागृती केली.या प्रभातफेरीला आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत आणि त्यांची संपूर्ण शासकीय अधिकारी टीम यांनी भेट देऊन कौतुक केले.आजरा पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी प्रभात फेरी मधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आज रात्री आठ वाजता “अर्थ मिनिट अंतर्गत”किमान दहा मिनिट आपल्या घरातील सर्व विजेची उपकरण बंद करून वीज बचतीचा आणि काटकसरीचा नवा अध्याय आपणापासूनच सुरू करावा असे आवाहन केले.त्याचप्रमाणे सायकलचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे पायी चालण्यानेही आपला शारीरिक व्यायाम होऊन अनावश्यक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी होतो व पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते.या जाणिवे सह विद्यार्थी जीवनामध्ये कागदाचाही वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे असे सांगून कागद निर्मितीसाठीचे वृक्षतोड, वीजवापर,पाण्याचा अपव्यय कमी करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, सौ.व्ही.ए.वडवळेकर,सौ.ए.एस.गुरव,कला शिक्षक कृष्णा दावणे, सौ.एस.डी.इलगे, श्रीम.एन.ए.मोरे, व्ही.एस.गवारी.आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
