निवासी वसतिगृहामध्ये बालकांमध्ये हाणामारी ; तळसंदे येथील रॅगिंगचा प्रकार उघडकीस

निवासी वसतिगृहामध्ये बालकांमध्ये हाणामारी ; तळसंदे येथील रॅगिंगचा प्रकार उघडकीस

Loading

सोशल मीडियावर चित्रीकरण व्हायरल आणि नागरिकांत संताप

पेठवडगाव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुले हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा हा प्रकार उघडकीस येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हॉस्टेलमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकिद दिली होती. याच भांडणाच्या कारणावरून पीटी परेड वेळी आरोपी याने जखमी विद्यार्थ्यास स्टेजवर नेऊन मारहाण केली होती. यात विद्यार्थ्याला दुखापत झाली. हा प्रकार सोमवारी (दि.६) ला घडला तर याप्रकरणी मंगळवारी (दि.७) रोजी रेक्टर विरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुले लहान विद्यार्थ्यांना रॅगिंग करुन मारहाण करत असल्याची घटना व्हायरल व्हिडिओमुळे समोर आली आहे. हातात बेल्ट, बॅट आणि दांडके घेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर पालकांसह नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हे शाळेच्या हॉस्टेलमधील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *