चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – चेअरमन माधवराव घाटगे

चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – चेअरमन माधवराव घाटगे

Loading

वाघजाई यात्रेनिमित्य भव्य कुस्तीच्या मैदानाचे आयोजन.

जयसिंगपूर / प्रतिनिधी

चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्या कडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. चिंचवाड येथे वाघजाई यात्रेनिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटणप्रंसगी श्री. घाटगे बोलत होते. यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिव प्रतिष्ठान चे प्रमुख संभाजी भिडे(गुरुजी) , पै. अमृतमामा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी मैदानात ५० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्तीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशानेच चिंचवाडमध्ये वाघजाई यात्रेनिमित्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची ‘गुरुदत्त केसरी’ कुस्ती पै. श्रीमंत भोसले व सचिन ठोंबरे यांच्यात रंगली. गुणांच्या जोरावर पै. भोसले यांनी पै. ठोंबरे यांच्यावर विजय मिळवत ‘ गुरुदत्त केसरी ‘ ची गदा व रोख ५१ हजार रुपयेचे बक्षिस मिळवले. व्दितीय क्रमांकाची कुस्ती रोहन रंडे विरुद्ध प्रदिप ठाकूर यांच्यात झाली. यामध्ये पै. रोहन यांने एकचाक डावावर विजय मिळवला. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. रणजित राजमाने विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाली. यात डावरे जखमी झाल्यामुळे राजमाने याला विजयी घोषित केले.

सर्व विजेत्यांना गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे, अमृतमामा भोसले , संभाजी भिडे (गुरुजी) व प्रमुख मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. दत्त उदयोग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी यावेळी मैदानाला भेट दिली. यावेळी दत्त फुडस् अँण्ड मिल्क चे डायरेक्टर अदित्य घाटगे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने – देशमुख, शिवाजी सांगले, सरपंच जालिंदर ठोमके, विठ्ठल घाटगे ,बजरंग खामकर, नारायण मोहिते, संदीप पाटोळे, सुरेश गोधडे, अभय चौगुले, पंकज चौगुले, विजय गोधडे, कुमार माने, राजेद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सुनिल चव्हाण , शरद गोधडे, युवराज गोधडे, संदिप कदम, संतोष गोधडे, प्रकाश पाटोळे, प्रमोद चव्हाण, नायकू गोधडे व सर्व कुस्ती समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *