उमळवाड ग्रामस्थांकडून मराठवाडा पूरग्रस्तांसाठी 78300 हजार रुपयांची भरीव मदत

Loading

जयसिंगपूर /प्रतिनिधी:

मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार उमळवाड(ता. शिरोळ) येथे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली. या आवाहनाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 78हजार 300रुपये गोळा झाले असून ही रक्कम लवकरच पूरग्रस्तांना साहित्य देण्या करिता दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव (दादा) पाटील यांच्याकडे देण्यात आलीगेल्या महिन्याभरापासून राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उमळवाड ग्रामस्थांनी गावामध्ये गट, तट बाजूला ठेवून मदत गोळा केली आहे. यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उस्फूर्त सहकार्याची भावना ठेवून रोख तसेच चेकच्या माध्यमातून मदत दिली आहे ग्रामस्थां यामध्ये पुढाकार घेऊन ही मदत गोळा केली असून सदर मदतश्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *