विवाहितेचा कोयत्याने निघृण खून : डोळ्यात चटणी टाकून गाल व चेहऱ्यावर सपासप वार

Loading

५-६ महिने येणार नाही” असे सांगून फरार पती पोलिसांच्या ताब्यात

पेठवडगाव : प्रतिनिधी

भादोले (ता. हातकणंगले) येथे एका विवाहितेचा पतीने कोयत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २९) रात्री उघडकीस आली. पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत आरोपीने तिचा खून केला. रोहिणी प्रशांत पाटील (वय २८, रा. भादोले) असे मृत विवाहितेचे नाव असून, प्रशांत पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे.घटना भादोले-कोरेगाव रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रोहिणी व प्रशांत पाटील हे दोघे ढवळी (जि. सांगली) येथून मोटारसायकलवरून परत भादोले येथे येत होते. दरम्यान, रस्त्यातच प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी फेकली व कोयत्याने तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला ठार मारले. खून केल्यानंतर प्रशांत गावात येऊन काही स्थानिकांना “पत्नीचा खून केला आहे, मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता ५-६ महिने येणार नाही” असे सांगून फरार आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *