पर्यावरण संवर्धन परिषदेला जगभरातील तज्ञ एकत्र : डॉ. सौरव दीक्षित

पर्यावरण संवर्धन परिषदेला जगभरातील तज्ञ एकत्र : डॉ. सौरव दीक्षित

Loading

शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल ‘ग्रीनएआय नेक्सस २०२५’ परिषद

यड्राव / प्रतिनिधी

शरद इन्स्टिट्युटमध्ये होत असलेली ही परिषद म्हणजे बुद्धिमत्ता, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मेळावा असून यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जा लवचिकता आणि पृथ्वी प्रणाली विज्ञानाच्या समन्वयावर काम करणाऱ्या तज्ञाना एकत्र आणते. असे प्रतिपादन चितकारा विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. सौरव दीक्षित यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ‘ग्रीनएआय नेक्सस २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागने उपस्थीत होते.


या परिषदेसाठी जगभरातून दोनशे शोधनिबंध मिळाले आहेत. त्यातूल उच्च गुणवत्तेचे ७३ शोधनिबंध निवडले आहेत. त्यामध्ये अक्षय ऊर्जा, पर्यावरणीय देखरेख, शाश्वत शेती, स्मार्ट शहरे आणि लवचिक पायाभूत सुविधांमध्ये एआय यासारख्या विषयांचा समृद्ध संग्रह समाविष्ट आहे. तर उद्योगामधील आवश्यक तंत्रज्ञान याचे संशोधन अभियांत्रिकी शिक्षण संस्थेमध्ये होणे आवश्यक आहे. आणि हे सर्व तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्ये ह्या परिषदेमधून जगासमोर येतात. त्यामुळे अशा परिषदा महत्वाच्या आहेत.
यावेळी रशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ एरोस्पेस अँड इन्स्ट्रुमेंटेशनचे डॉ. किरिल एपि फँटसेव्ह,सीएमआर विद्यापीठाचे डॉ. रजत गेरा, के.आर. मंगलंम विद्यापीठाचे प्रा. डॉ कौशल कुमार आदी तज्ञांनी शरद इन्स्टिट्यूटच्या या परिषदेचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. अपुर्वा बापट आणि प्रा. कल्याणी बेडेकर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. एस.ए. खोत यांनी मानले. यावेळी परिषदेचे संयोजक डॉ. गोविंदसिंग पटेल व  डॉ. सुकांत देबनाथ यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, डिन, प्राध्यापक, संशोधक उपस्थीत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *