![]()
हातकणंगले : प्रतिनिधी
अतिग्रे ता. हातकणंगले येथील घोडावत कॉलेज च्या गेट नंबर 2 जवळ आळते येथील अक्षय राजेंद्र खटावकर यांनी किराणा दुकानात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखु असे विक्री आणि साठा सापडला. अन्न व औषध प्रशासनाची धड. अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन कोल्हापूरचे विजय जयसिंग पाचुपते यांना मिळाले माहितीनुसार हातकणंगले पोलीसाच्या सहकार्याने ही धाड टाकली. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली, राज्यात प्रतिबंधीत तसेच लोकांचे शरीरास अपायकारक अशा नशाकारक, अपायकारक पदार्थाच्या सेवनाचे लोकांच्या शारीरिक स्वास्थ्य हानी पोहचण्याची जाणीव असताना सुध्दा सदर आदेशाचे उल्लंघन केले.
एकुण 15214/- रुपये किमतीचा व वर्णनाचा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात विक्री व साठा करणेस बंदी घालुन प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा अवैध्य मुददेमाल जप्त केला. त्याचे विरुध्द भारतीय न्याय संहीता कलम 123, 274, 275 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार करीत आहेत.
