डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नव प्रवेशित विद्यार्थ्यांसह पालकांचाही स्वागत व सत्कार संपन्न

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नव प्रवेशित विद्यार्थ्यांसह पालकांचाही स्वागत व सत्कार संपन्न झाला. प्रारंभी ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कै.डॉ.जे. जे.मगदूम व कै. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ.एम.बी. भिलवडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम होते.

यावेळी कार्यक्रमासाठी उद्योगपती श्री.अजित गटे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पी.डब्ल्यू.डी.चे कार्यकारी अभियंता श्री. क्रांतीकुमार मिरजकर, पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल ठाकूर,प्रा.युवराज पाटील,कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे उपस्थित होते.

स्वायत्त महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतला असून एन.इ.पी. २०२० नुसार शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबत,परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून, नवीन तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रम महाविद्यालयाने अंतर्भूत केला आहे. त्याचा फायदा प्लेसमेंट,विद्यापीठातील रँकर्स, परदेशात स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे प्रभारी प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या. तर विद्यार्थ्यांना चागले शिक्षण, सोई सुविधा सोबत चांगल्या प्लेसमेंट देण्याची ग्वाही कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन एड.डॉ.सोनाली मगदूम यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. चांगल्या प्लेसमेंट सोबत चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले. चांगल्या नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा चांगले उद्योजक होऊन इतरांच्या हाताला काम देऊ शकतो असे श्री. अजित गटे यावेळी म्हणाले. सोबतच काही विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कंपनीमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे दिली.आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असून महाविद्यालयाचा मी ऋणी आहे असे कृतज्ञउद्गार श्री. क्रांतीकुमार मिरजकर यांनी काढले.

मुलींनी धाडसी बनलं पाहिजे. गरज वाटेल तिथे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन समाजकार्यात झोकून दिले पाहिजे असे मत जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केले. फेसबुक इंस्टाग्राम च्या पाठीमागे न लागता कष्टकरी आई-वडिलांची आठवण ठेवून,  प्रेरित होऊन, धाडसी बनवून विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे तंत्रज्ञानात आपण कितीही मोठे झालो तरी आई-वडिलांचा विसर पडू देऊ नका असे मत प्रेरणादायी वक्ते प्रा. युवराज पाटील यांनी मांडले.       
प्रारंभी सांस्कृतिक विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. यावेळी माजी विद्यार्थी, नवप्रवेशित विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले. आभार डीन-स्टुडंट्स प्रा.पी. पी. पाटील यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *