![]()
मोबाईलसह मोटर सायकल असा 2 लाख 32 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

जयसिंगपूर : प्रतिनिधी
पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई केली असून गांधीनगर तालुका करवीर येथील दोन मोबाईल चोरट्यांना शीतफिने जेरबंद केले. या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यातील 11 मोबाईल आणि मोपेड मोटरसायकल असा दोन लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की दिनांक 8 व 9 सप्टेंबर दरम्यान पाटील अख्खा मसूर समोर पद्मविरा इन्फोटेक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन च्या पत्र्याच्या शेडमध्ये चोरीचा गुन्हा घडला होता. भारतीय नाहीसंहिता कलम 349, 303 अन्वये याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारणमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान सात हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटरसायकल, आणि अनुक्रमे 14000 दहा हजार पंचवीस हजार पंधरा हजार अठरा हजार पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार आणि दहा हजार असे विविध कंपनीचे अकरा मोबाईल असा दोन लाख बत्तीस हजार चा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त केला.
सदरची कारवाई जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,अंमलदार ताहीर मुल्ला, बाळासाहेब गुत्ते,कोळी रहिमान शेख,महेश घाटगे, चालक मोहसीन मोमीन यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक ताहीर मुल्ला करत आहेत.
