डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Loading

कौशल्य विकास शिक्षणावर लक्ष द्या : डॉ भिरूड

जयसिंगपूर: प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. ‘मृदगंध २०२५’ वार्षिक बक्षीस वितरण याबरोबरच विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून सी.ओ.इ.पी. पुणे टेक्निकल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ. सुनिल भिरूड, सोनाई इन्फ्रा ग्रुपचे डायरेक्टर, माजी विद्यार्थी श्री. अजिंक्य पाटील व अभिनेत्री पूजा काळे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल विकास शिक्षणावरती भर देत परिपूर्ण बनावे असा संदेश डॉ. भिरूड यांनी दिला.

तर डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या शिस्त व नम्रता या शिकवणीमुळे आम्ही मोठे झालो असे अजिंक्य पाटील म्हणाले. महाविद्यालयाच्या प्रगती बाबत डॉ. सोनाली मगदूम यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे आपल्या कॉलेज जीवनाला उजाळा मिळाला असे मत अभिनेत्री पूजा काळे यांनी मांडले.

स्वागत कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी केले. महाविद्यालयामार्फत सालाबाद प्रमाणे घेण्यात येणारा डॉ. जे. जे.मगदूम स्मृती बेस्ट आउटगोइंग पुरस्कार कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या कु. प्रथमेश गोडसे यांनी पटकावला. तर त्याच विभागाच्या कु. आकांक्षा गायकवाड हिने डॉ. प्रभा जे. मगदूम बेस्ट अकॅडमी एक्सलन्स पुरस्कार पटकविला. रोख रक्कम व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या उपक्रमाच्या यशासाठी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभांगी पाटील यांच्या सहाय्याने सर्व डिन्स विभाग प्रमुख, सर्व क्लबचे प्रमुख प्राध्यापक प्राध्यापक केत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *