![]()
सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त 30 आदर्श शिक्षकांचा गौरव
हातकणंगले : प्रतिनिधी
येथील डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशन, हातकणंगले यांच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच भाग म्हणून ५ सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात येते.
सन २०२५-२६ या चालू सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार २४, आदर्श शाळा २ व आदर्श हायस्कूल २ तसेच विशेष शिक्षकरत्न पुरस्कार २ असे एकूण ३० पुरस्कार फौंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना निवडपत्र देण्यात आले. त्यामध्ये विशेष शिक्षकरत्न रविकांत आडसुळ, अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका व भिकाजी कासार, शिक्षणाधिकारी, इचलकरंजी मनपा तर प्राथमिक विभाग– सहदेव हरगे, प्रविण पिसे, वजीर माणकापूरे, नंदकुमार पिराई, सायरा तांबोळी, राजकुमार भोसले, सलमा मुल्ला, मनिषा परिशवाड, भिमराव पाटील, जयश्री कोळी, सतीश कांबळे तर माध्यमिक विभाग* – अमोल मिणचेकर, गीतांजली शेटे, प्रियंका लाड, पद्मजा चव्हाण, भरत घाटगे, अशोक भोसले, हेमांगी वडेर, लक्ष्मण कांबरे, मनिषा शिंदे, दादासाहेब पाटील, संभाजी पाटील, हणमंत पवार, देवानंद कांबळे यांना तसेच कन्या विद्या मंदिर माणगाव, विद्या मंदिर, खोची, आदर्श विद्यालय, नागाव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव या शाळांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडपत्र वाटप कार्यक्रम फौंडेशनचे उपाध्यक्ष विशाल साजणीकर, समन्वयक तानाजी पोवार, सचिव राकेश खाडे व संचालक शशिकांत मिणचेकर आदी उपस्थित होते.


