स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचे वावरातच ध्वजारोहण : शेतकरी हाच खरा देशभक्त 

 माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन 

आजरा : प्रतिनिधी

 जेथून शक्तिपीठ जाणार आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या वावरात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवलाय. कारण या सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की देशप्रेमाचा ठेका फक्त त्यांनीच घेतलाय. खरे देशप्रेमी आणि देशभक्त हा शेतकरी आहे. असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. शक्ती पीठ महामार्ग विरोधात एकवटलेल्या बळीराजाच्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्याने देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकसंख्या केवळ 40 कोटी होती तरीसुद्धा दोनवेळ खायला मिळेल इतकं अन्नधान्य देशात पिकत नव्हतं. परदेशातून अन्नधान्य आयात करावं लागत होते. ही तत्कालीन परिस्थिती लक्षात आणून देत  लालबहादूर शास्त्रीनी आवाहन केल्यानंतर हरित क्रांती घडवून आणली आणि 40 कोटीची 140 कोटी लोकसंख्या झाली तरी आज आपण साखर, तांदूळ, गहू, सोयाबीन, मका, फळे,भाजीपाला निर्यात करतो. एवढा पराक्रम करणारे शेतकरीच खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत. असे ते म्हणाले. 

तर शक्तिपीठाच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बॉक्साईड तस्करी करण्याचा डाव आहे. 32 हजार कोटीच्या रस्त्याला एक लाख सहा हजार कोटी रुपये किंमत दाखवून 70 हजार कोटी वाटून घेण्याचा यांचा डाव आहे. असा आरोप ही माझी खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का? अडाणीची गडचिरोलीच्या अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे. हे खनीज गोव्याच्या त्याच्या बंदरावर नेऊन बाहेर निर्यात करण्यासाठी हा डाव आहे. देशातील उद्योगपतींचे लाड पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *