![]()
वैदयकिय कामी शेतकऱ्यांना धनादेश प्रदान
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून श्री गुरुदत्त शुगर्स ने पारदर्शीपणे व स्वच्छ कारभार केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख – दु: खात कारखाना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. शेतकरी व कामगार ही कारखान्यांनी दोन महत्वाची चाके असून त्यांच्या पाठबळावर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्री माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले . १५ ऑगस्ट निमित्त कारखाना कार्यस्थळावरती किसान कार्ड योजनेतील शेतकरी यांना वैद्यकिय कामी धनादेश प्रदान तसेच कारखान्याचे मयत कामगार व ऊस तोडणी मजूर यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी चेअरमन श्री. घाटगे बोलत होते.
पुढे बोलताना श्री.घाटगे म्हणाले, सन २०१७-१८ या वर्षीच्या गळीत हंगामापासून किसान कार्ड ही योजना सुरू केली आहे . या योजनेत आतापर्यत ९ हजार हुन अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध वैद्यकिय उपचार व शस्त्रक्रियासाठी आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे . किसान कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे . अशा उपक्रमामुळे श्री गुरुदत्त शुगर्सची विश्वासर्हता अधिक दृढ होऊन कारखाना व शेतकरी यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट होत आहेत.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दगडू माने यांचा व अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठच्या जागतिक लिडरशिप प्रोग्रॅममध्ये उत्तुंग यशा प्राप्त केलेबदल टाकळी येथिल अपूर्वा पाटील हिचा सत्कार कारखान्याच्या वतिने करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाला श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे ,धीरज घाटगे,कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने -देशमुख, शिवाजी सांगले, अण्णासाहेब पवार, धोंडीराम नागणे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक -निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, संभाजी भोसले,पोपट पुजारी , मुंकुद पुजारी , सदाशिव आंबी, अन्वर जमादार, सुरेश सासणे यांच्यासह शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी, कामगार व ऊसतोडणी मजूर यांच्या मदतीला धावला श्री गुरुदत्त शुगर्स .
या कार्यक्रम प्रसंगी किसान कार्ड योजनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध आजार शस्त्रक्रिया व उपचारासाठी यावेळी १७ शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचे धनादेश , कारखान्यामध्ये काम करणारे दोन मयत कर्मचारी यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख तर ऊस तोडणी करणाऱ्या मयत मजुरांच्या वारसांना तीन लाख रुपयांचा धनादेश कारखान्याच्या वतीने चेअरमन श्री. माधवराव घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले . अडचणीच्या काळात श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याने शेतकरी व कारखाना यांचे अतुट नाते निर्माण झाले आहे.
गुरुदत्त शुगर्स च्या किसान कार्डधारक शेतकरी, मयत कामगार व मयत ऊस तोडणी मजूर यांच्या वारसांना चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले .
