![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करून जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह २५ पोलीस कर्मचारी बांधवांना दीप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी राखी बांधली. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले भेट कार्ड देऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला. पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक सत्यवान हाके यांनी विद्यार्थींना पोलीस स्टेशन मधील प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते याची प्रात्यक्षिक माहिती दिली. व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या प्राचार्य,शिक्षकांनी विद्यार्थिनींकडून पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या या वेगळ्या राखी पौर्णिमेचे पोलीस व्यवस्थापनाने कौतुक करून धन्यवाद दिले.
