प्रशासन हडबडले : गंगाराम कांबळे यांची केली व्यवस्था

Loading

अन्वेषण लाईव्ह न्यूज इफेक्ट

आजरा प्रतिनिधी : राजाराम कांबळे

आरदाळ येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची प्रथम अन्वेषण लाईव्ह ने बातमी सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आली व प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली.

गंगाराम यांच्या वयाचा विचार करून विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन यांनी त्यांना चटई, ब्लॅंकेट, स्वेटर यासह काही वस्तू भेट दिल्या. माणुसकी अजूनही शिल्लक आहे या भावनेतून मदत देणाऱ्यांची गंगाराम कांबळे यांनी भाऊक होत हात जोडून आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव व अमोल बांबरे यांनी देखील अन्वेषण मीडियाचे आभार मानले.

अवघ्या आठ ते दहा दिवसात मदतीचा ओघ सुरू झाला. तहसीलदार यांच्यापासून सर्वांनी त्यांची काळजी घेतली. उत्तुर येथील हेल्पिंग हँड फाउंडेशन यांनी छताची जबाबदारी घेतली. जमिनीवर भर टाकून ऒल कमी करण्यासाठी भर टाकण्याची जबाबदारी आरदाळकर ग्रुपने घेतली तर शंभर रुपयात समाजसेवा या उत्तूर परिसरातील ग्रुपने फरशी बसवण्याची जबाबदारी घेतली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *