![]()
ठेवीमध्ये ४२ कोटी ४१ लाख ४३ हजाराने वाढ
जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि,जयसिंगपूरया बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन डॉ. श्रीवर्धन एस.पाटील यांचे अध्यक्षतेखाली कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर-सांगली रोड जयसिंगपूर येथे शनिवार ९ ऑगस्ट रोजी खेळीमेळीत संपन्न झाली.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणा नुसार बँकेचा कारभार पारदर्शक चालत असलेने बँकेचा पाया भक्कम झाला असल्याचे प्रतिपादन केले.तसेच बँकेसऑडीट वर्ग “अ”मिळाल्याचे सांगून बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला गत सालाच्या ठेवीमध्ये ४२ कोटी ४१ लाख ४३ हजाराने वाढ होवून एकूण ठेवी रु.२७९कोटी ८१ लाख इतक्या झाल्या तर कर्जामध्ये रु.१७ कोटी १९ लाखाची वाढ होवून चालू आर्थिक सालात कर्जे रु.१६० कोटी ०९ लाखावर गेली आहेत.
बँकेचा एन.पी.ए.०२८ टक्केव थकबाकी २.६६टक्के राहीली असून नियमानुसार रु.१कोटी ५८ लाख ४३ हजार इतक्या तरतूदी करून निव्वळ नफा रु.१ कोटी ३१लाख ०१ हजार झाल्याची माहिती चेअरमन डॉ.श्रीवर्धन एस.पाटील यांनी दिली. तर यंदा १० टक्के लाभांशची ही घोषणा यावेळी करण्यात आली.
श्रीभरत बँक सरकारी व व्यापारी बँका देत असलेल्या सर्व सोईसुविधा देणारी व युपीआय सेवादेणारी शिरोळ तालुक्यातील पहीली सहकारी बँक असलेचे प्रतिपादन केले.तसेच बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी नविन शाखा पेठ वडगांव ता.हातकणंगले येथे घटस्थापणेच्या दिवशी सुरु केली असून हुपरी ता.हातकणंगले येथे लवकरच सुरु करीत असलेसंबंधी आनंदाची बातमी दिली.तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन अहवाल सालात दिवंगत झालेले ज्ञात अज्ञात तसेच पहलगाममध्ये निधन पावलेल्या व्यक्तीना श्रध्दांजली अर्पण करणेत आली.यावेळी भरत मेडिकल ट्रस्टजयसिंगपूर यांचेमार्फत श्री.भरत अर्बन को-ऑप बँक लि यांच्यावतीने देण्यात येणारा डॉ.एस.के.पाटील धन्वंतरी पुरस्कार हरोलीचे प्रसिध्द धन्वंतरी डॉ.एस.डी.पाटील,डॉ जे.जे.मगदूम समाजभूषण पुरस्कार बँकेचे संस्थापक संचालक व कुरुंदवाड नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.रावसाहेब उर्फ दादगोंडा आपगोंडा पाटीलव बँकेच्या वतीने देणेत येणारा श्री भरत रत्न पुरस्कार शिरोळ येथील उच्च विद्याविभुषित शेती तज्ञ व व्याख्याते डॉ. श्री.प्रविण चंद्रकांत माळी यांना आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या शुभहस्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. बँकेचे चेअरमन डॉ.श्रीवर्धन एस. पाटीलयांनी शासना मार्फत जाहीर झालेल्या सर्व योजना बँकेकडे सुरु असून त्या योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन केले तसेच शेतकरी यांचा मुलाने शिक्षणाची कास धरुन नोकरी करावी तसेच सहकारी बँकांची स्थापना,वाढीस लागलेली सहकार चळवळ त्यामधून सामान्य जनतेची झालेली प्रगती त्यामध्ये बँकांनी दिलेले योगदान अतिशय महत्वाचे असलेबाबत आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये व्यक्त केले.सदर सभेवेळी बँकेचे माजी चेअरमन,बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष पै.विठ्ठलमोरे यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सह असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल सभासदांचे वतीने प्रा.क्वाणे व श्री.सुरगोंडा पाटील दानोळी तसेच नांदणी सहकारी बँकेच्या सर्व संचालकां मार्फत तसेच शिरोळ पंचक्रोशितील संस्था व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जनतेच्या प्रगतीमध्ये बँकेचा फार मोठा वाटा आहे.
आमदार डॉ.अशोकराव माने म्हणाले की डॉ.एस.के.पाटील व बँकेच्या सहकार्यामुळेच माझ्यासारखी सामान्य व्यक्ती एमआयडीसी,हॉस्पीटल यांची निर्मिती करु शकलो असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये माजी खासदारराजू शेट्टी यांनी बँकेने तारदाळ पाणीपुरवठा योजना कोरोना कालावधीमध्ये सामान्य जनतेसाठी सेवाभावी वृत्तीने चालू केलेल्या करुन बँकेने सामाजिक बांधीलकी जपलेचे नमुद केले.
सत्कारमूर्ती डॉ. एस.डी.पाटील यांनी सत्कारास उत्तर देताना आपल्या दवाखान्याचे उद्घाटन डॉ. एस.के. पाटील यांनी केलेचे नमुद केले, तसेच समाजभुषण पुरस्कार विजेते श्री.रावसो पाटील यांनी बँकेच्या स्थापणे वेळच्या अनेक आठवणी व बँकच्या सुरुवातीच्या काळातील वाटचालीचे विवेचन केले.बँकेने लवकरच बँकेची सांगली येथे शाखा सुरु करावी अशी आशा व्यक्त केली.आपल्या सत्कारास उत्तर देताना डॉ.प्रविण माळी यांनी सद्याची शेती करण्याची पध्दत,रासायनिक खतांचा वारेमाप वापर त्यामुळे शेतीचा वाढलेला प्रचंड खर्च आणि इतका खर्च करूनही पिकांची घसरलेली गुणवत्ता याबाबत उदाहरणासह विवेचन केले. या सर्वामधून मार्ग काढून जैविक पद्धतीने शेती कशी करावी जेणेकरुन शेतीचा खर्च कमी होईल,नैसर्गिक किडींचा किडनाशक म्हणून वापर आणि या सर्वाकरीता मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देत असल्याची माहिती त्यांनी दिली. बँकेचे संचालक डॉ.किरण वि.अणुजे यांनी स्वागत केले.संचालक पै.विठ्ठलबाबूराव मोरे यांनी विषयवार अहवाल वाचन केले. Lसर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखी मंजुरी दिली.यावेळी सावकर मादनाईक,शैलेश आडके,डॉ.अतिक पटेल, रावसाहेब पाटील कवठेगुलंद, हायकोर्ट वकील ऍड.राजवर्धन पाटील,शिगाव बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी,पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे संचालक प्रसन्ना भालचंद्र कुभोजकर यांनी आभार मानले.

