अंधारातून प्रकाशाकडे नेणारी दीप माळ

Loading

जिद्दी,कष्टाळू आणि ध्येयवेडा युवक डॉ.फगरे यांचा प्रेरणादायी प्रवास

 चंदगड : प्रतिनिधी

अपार मेहनतीच्या आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या बळावर डॉ.फगरे यांनी जे.जे.मगदुम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मधून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून डॉक्टरची पदवी मिळवली. येथेच न थांबता ज्ञानसंपादनाच्या यात्रेत त्यांनी पुढे झेप घेतली आणि होमिओपॅथीच्या रेपरटरी / मटेरिया मेडिका या अत्यंत महत्त्वाच्या विषयांतून एम.डी.ही उच्च पदवी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगलोर मधून विशेष गुणवत्तेने मिळवली. या शैक्षणिक यशानंतर त्यांनी होमिओपॅथीची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. उपचार पद्धतीतील समज, अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा त्रिवेणी संगमामुळे त्यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला लोकप्रियता मिळाली. अनेक रोगांवरील डॉ.फगरे यांच्या अचूक उपचारांची आणि परिणामकारकतेची चर्चा होते.चंदगड तालुक्यातील पोरेवाडी या छोट्याशा गावात जन्मलेला एक जिद्दी,कष्टाळूआणि ध्येय वेडा युवक आणि त्याचा जीवनाचा प्रवास म्हणजे जणू अंधारातून उजेडाकडे नेणारी दीपमाळ असे म्हणावे लागेल.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण आणि कुटुंबाची आर्थिक कमतरता होती.पण आत्मविश्वास,कठोर परिश्रमाच्या जोरावर तयारी आणि आई-वडिलांचा आधारावर त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरु ठेवली.त्यांची शिक्षणाची,ज्ञानाची भूक इतकी होती की,त्यांनीअनेक अडथळ्यांचे डोंगर लिलया पार केले. असंख्य जुनाट आजार असलेल्या रुग्णांना रोगमुक्त केले,त्यांची होमिओपॅथीची उपचार पध्दती आज पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे.याच कार्याची पोहोच पावती म्हणून“गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ नेसरी यांच्या कडून दिला जाणारा सरसेनापती आरोग्यभूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

डॉ.फगरे केवळ कुशल वैद्यकीय व्यावसायिकच नाहीत,तरते एक प्रेरणादायी शिक्षकही आहेत.गडहिंग्लज येथील ई.बी.गडकरी होमिओपॅथी कॉलेजचे ते सन्माननीय लेक्चरर आणि आता नव्याने नियुक्त झालेले प्राचार्य आहेत.त्यांच्या अध्यापन शैलीत गोडवा आहे,अनुभवाची खोली आहे आणि विद्यार्थ्यांवरीलअपार प्रेम आहे.ते वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जिज्ञासेचा प्रकाश येतो.शिस्त,नियोजनआणि सातत्य या मूल्यांची शिकवण देत ते विद्यार्थ्यांना केवळ विषय शिकवत नाहीत,तर समाजसेवेच्या कार्यातही ते पुढे असतात.गडहिंग्लज परिसरातील रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा नेहमीच हेतू असतो.विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.गडकरी कॉलेजचे संस्थापक नरसू पाटील,ब्रह्मानंद पाटील अन्य सहकारी शिक्षकवृंद आणि अ‍ॅडमिन कर्मचारी यांचाही त्यांना पाठिंबा लाभतो.संपूर्ण निष्ठेने,सेवाभावानेआणि नेतृत्व गुणांच्या बळावर त्यांनी नुकतीच गडकरी होमिओपॅथी मेडीकल कॉलेजची प्राचार्य पदाची धुरा हाती घेतली आहे.त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय नावारूपास येईल,यात शंका नाही.डॉ.फगरे यांना त्यांच्या नवनियुक्त प्राचार्य पदाच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *