चिपरी येथील खून प्रकरणातील हल्लेखोरांना कर्नाटकात अटक

Loading

जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जयसिंगपूर : प्रतिनिधी

चिपरी तालुका शिरोळ येथे काल बुधवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास संदेश लक्ष्मण शेळके नामक युवकाचा आज्ञातानी खून केला होता. या युवकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले होते. हे हल्लेखोर कर्नाटकातील चिकोडी येथे असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी कर्नाटकात चिकोडी येथे जाऊन संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. युवराज रावसाहेब माळी वय वर्ष 30 फिल्टर हाऊस जवळ राहणार चिपरी, सुरज बाबासो ढाले वय वर्ष 30 मुळगाव खोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, गणेश संभाजी माळी वय वर्षे 25 माळभाग चिपरी अशी तीन संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.

उपविभागीय पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेनुसार जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने या हल्लेखोरांचा तपास युद्धपातळीवर घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, विनोद जमादार,किशोर आंबुडकर, पोलीस आमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला रहमान शेख, बाळासाहेब गुप्ते, रुपेश कोळी, जावेद पठाण यांचा या विशेष पथकामध्ये सहभाग होता.

याबाबत पोलिसातून समजलेली हकीकत अशी की मयत संदेश लक्ष्मण शेळके याचे नातेवाईक भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली. मयत संदेश शेळके हे फिर्यादीचे पुतणे आहेत. फिर्यादी यांचा पुतण्या संदेश लक्ष्मण शेळके यांचा सहा तारखेस कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात करण्यासाठी धारदार शस्त्राने वार करून जीवेत ठार मारून खून केला असले बाबतची फिर्याद नमूद आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश दिले. या गंभीर गुन्ह्याचा आधीच तपास करीत असताना पोलीस पथकाने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेची पडताळणी केली. हा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील तीन संशयित हल्लेखोर हे चिकोडी कर्नाटक येथे असली की खात्रीशीर बातमी मिळाली.
जयसिंगपूर पोलिसांचे पथक तात्काळ कर्नाटका चिकोडी येथे रवाना झाली.चिकोडी शहर आणि परिसरात सापळा असून या गुन्ह्यातील संशयीतांना जयसिंगपूर पोलीस पथकाने सीताफिने ताब्यात घेतले.

मयत संदेश शेळके याच्या सख्या बहीनीने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले होते.तीच्या बोलण्याचा राग मनात धरून तिचा भाऊ संदेश शेळके याचा काटा काढण्याच्या उद्देशाने सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजता लिफ्ट मागण्याचा बहाणा करून चिपरी गावात घोडावत ऑइल मिलच्यामागे राजू सूर्यवंशी यांचे राहते घराकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन तेथे कोयत्याने त्याच्या मानेवर तपास करून खून केला. संशयीतांपैकी दोन आरोपी यांच्या मदतीने मोटरसायकल वरून चिकोडी येथे पळून गेल्याची कबुली संशयित आणि दिली. या गुन्ह्याच्या तपास कामी त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *