![]()
आदर्श व रवळनाथ बालक मंदिर नूतन शाळा इमारतींचे पालकमंत्री यांचे हस्ते उदघाटन

आजरा / हसन तकीलदार
शैक्षणिक संस्थामध्ये आज स्पर्धा तयार झालेली आहे. विद्यार्थी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. आपल्या पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते त्यासाठी पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. गुणवंत आणि आदर्श विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि हे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकही त्या दर्जाचे असायला हवेत. असे प्रतिपादन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.
येथील जनता एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श व रवळनाथ बालक मंदिरशाळा नूतन इमारतींचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी होते.
अध्यक्षीय भाषणात अशोकआण्णा यांनी जनता एज्युकेशन सोसायटी शिक्षणाचे वटवृक्ष बनल्याचा अभिमान व्यक्त केला. बालवाडी ते पदवीत्तर शिक्षण या संस्थेत उपलब्ध आहे. येथील विद्यार्थी अनेविध क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहेत. देश विदेशात विविध क्षेत्रात काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील शिक्षण देण्याचा मानस संस्थेचा आहे. असा गौरव केला.
यावेळी संचालक के. व्ही. येसणे म्हणाले कि, 1965 साली अत्यंतप्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून कै. काशिनाथ आण्णा चराटी, कै. माधवराव देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली. 40 पटावरून ही शाळा एका खोलीत सुरु झाली. आज हीयेथे अखंड ज्ञानगंगा वाहते आहे. 2008 नंतर अशोकअण्णांच्या धाडसी वृत्तीने या संस्थेला उज्वल परंपरा लाभली आहे. सर्व सुविधानीयुक्त हे महाविद्यालय शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिकास आल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
स्वागत प्रास्ताविक आदर्श बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका साधना नारे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यानी स्वागत गीत गायिले. मान्यवारांचा सत्कार करण्यात आला. शाळा इमारत बांधकाम इंजिनिअर अभिजित जानकर यांचा सत्कार विलास नाईक यांचे हस्ते करण्यात आला. तर जनता एज्युकेशन सोसायटीलाराज्य स्तरावरील आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून पारितोषिक मिळाल्याबद्दल नाम. आबिटकर यांच्या हस्ते अशोकआण्णा यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी शरद मगर, उपाध्यक्ष विलासनाईक, संचालक डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, जोत्स्ना चराटी, दशरथ अमृते, जी.एम. पाटील, अनिरुद्ध केसरकर, संजय चव्हाण, संतोष भाटले, शरीफ खेडेकर, असिफ पटेल, जयवंतसुतार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आण्णाप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलांबरी कांबळे यांनी आभार मानले.
