लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प पर्यावरण प्रेमी ऍड संतोष मळवीकर यांचा निर्धार

Loading

चंदगड: प्रतिनिधी

संपूर्ण तालुक्यात पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ॲड. संतोष मळवीकर यांनी आगामी पाच वर्षांत एक लाख झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प केला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शालेय विद्यार्थ्यांना शपथ देऊन करण्यात आला.

गेल्या वर्षी त्यांनी २०,००० झाडांचे वाटप ग्रामपंचायती व शाळांना केले. तर यावर्षी ३०,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चंदगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या फार्महाऊसवरून हजारो झाडे नेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या उपक्रमाच्या निमित्ताने ॲड. मळवीकर यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची, संगोपन करण्याची आणि त्यांच्यावर प्रेम करण्याची शपथ दिली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या झाडांना ‘भावेश्वरी’, ‘माऊली’ अशी प्रेमळ नावे दिली, जे त्यांच्या या भावनिक सहभागाचे प्रतिक ठरले.

यावेळी श्री भावेश्वरी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार, अध्यापिका कोरवी, अध्यापक कांबळे, पाटील तसेच रामनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी ॲड. मळवीकर यांच्या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. तर विद्यार्थ्यांना सातत्याने हिरवळ वाढवण्याचे आवाहन केले. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल आत्मीयता, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण करणारा एक हरित संस्कार मोहीम ठरत आहे.
चंदगड तालुक्याच्या भविष्यासाठी ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चळवळ ठरत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *