पोलिस वसाहत ओस पडली निवासी खोल्या दुरुस्तीची गरज

Loading

तर नवी कोरी इमारत वापराविनाच पडून  

चंदगड / तातोब गावडा- 

येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असणारी पोलीस वसाहत रिकामीच असून सध्या पोलीस कॉर्टर्स ओस पडल्या आहेत. पोलीस कर्मचारी वसाहतीतील पोलिसांसाठीची घरे दुरुस्तीची गरज असून नवी कोरी इमारत केवळ वापर नसल्याने पडूनच आहे. पोलीस कर्मचारी त्यांच्या सर्वंकष सुविधेसाठी शहरात अन्यत्र भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्यास आहेत. याकडे ग्रह खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा लक्षवेध करण्याची गरज आहे. जनतेचे रक्षण आपले सर्वस्व पणाला लावून करणाऱ्या पोलिसांची अशी अवस्था झाली असून आता सामान्य जनतेचे काय हाल होत असतील याची कल्पना केलेली बरी. याच परिसरात एक नवीन अपार्टमेंट बांधण्यात आले असून त्याचाही वापर होतच नाही. त्यामुळे पोलीस वस्तीमधील क्वार्टर्स नेमक्या कोणासाठी बांधल्या आहेत हा सवाल उपस्थित होत आहे.  चंदगड पोलीस कर्मचाऱ्यांना निवासासाठी शासनाने कॉटर्सद्वारे व्यवस्था केली आहे. मात्र पोलीस स्टेशन आणि कॉटर्स यामधील अंतर खूप आहे. शिवाय कुटुंबासाठी जवळपास शिक्षणाची आणि अत्यंत आवश्यक असलेल्या बाजारपेठेचीही सुविधा नाही. पर्यायाने शाळा आणि बाजारपेठ हे अंतर वसाहतीपासून खूप लांब आहे. कोणताही कर्मचारी कॉर्टर मध्ये राहत नाही. शहरापासून व पोलीस स्टेशन पासून लांब असणाऱ्या कॉटर्समध्ये राहण्यासपोलीस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत पोलीस कॉटर्समध्ये भयान शांतता आहे. तर इमारती हा झाडाझुडपांच्या विळख्यात आहेत. शिवाय पोलीस येथे राहतच नसतील तर नवी कोरी कॉटर्स कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. किमान या इमारतीचा वापर इतरशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना किंवा अन्य शासकीय कार्यालयासाठी केल्यास इमारती सुस्थितीत राहतील आणि शासनाचा लाखो करोडो रुपये वाया जाणार नाहीत अशी भावना व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *