आजरा – गडहिंग्लज पूर्व भागासाठी शेतीसंबंधित सेवा अधिक प्रभावी होणार

Loading

शेतकऱ्याच्या हितासाठी तेरणी हलकर्णी येथे एक स्वतंत्र शेती गट कार्यालय सुरू

गडहिंग्लज: प्रतिनिधी –

तेरणी (हलकर्णी), अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. कोल्हापूर लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याने कार्यक्षेत्राचा विस्तार करत आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्याच्या हितासाठी तेरणी हलकर्णी येथे एक स्वतंत्र शेती गट कार्यालय सुरू केले. तर आजरा – गडहिंग्लज पूर्व भागासाठी शेतीसंबंधित सेवा अधिक प्रभावी होणार आहे. अथर्व-दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी तातडीने विद्याधर कॉम्पलेक्स, आजरा येथे तसेच हलकर्णी-बसर्गे रोड हलकर्णी, ता. गडहिंग्लज येथे शेती गट कार्यालये सुरु करण्याचे नियोजन केले. शेतकऱ्यांना ऊस नियोजन, तोडणी-वाहतूक व शेतीसंबंधित सेवा अधिक प्रभावीपणे पुरविण्याच्या उद्देशाने तेरणी हलकर्णी येथे एक स्वतंत्र शेती गट कार्यालयाचा शुभारंभ आज शुक्रवार दि. 06 जून रोजी हलकर्णीच्या सरपंच सौ. योगिता सुमित संगाज, विरशैव सह. बँक संस्थेच्या संचालिका सौ. श्वेता सदानंद हत्तरगी आणि कडलगे सरपंच आनंदा जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

आज उद्घाटन प्रसंगी डॉ. गंगाधर बाळाप्पा व्हसकोटी, संदीप नाथबुवा, उत्तम येणेचवंडी, भिमराव मायन्नावर, युवराव पाटील, विनायक पाटील, राजू टोणपे, भाऊसाहेब काळोजी, रविराज गवळी, राजु गोरुले, फुलाजी खैरे, पप्पू इंचनाळकर, भरमा पाटील, सुहास पाटील, मनोहर इंगळे, दत्ता पाटील, सुनिल नांगणूरे, ईदमुबारक नाईकवाडे, अशोक गुरव, जोतीर्लिंग शिंदे, दुंडाप्पा घोळण्णावर, अशोक पाटील, मल्लापा पाटील, प्रकाश मोर्ती तसेच कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण, एचआर अश्रु लाड, विश्वनाथ ओऊळकर, राजेश नौकुडकर, इम्तीयाज खेडेकर, अशोक देसाई, प्रभाकर देसाई, उपस्थित होते.

चेअरमन मानसिंग खोराटे यांचे प्रेरणादायी नेतृत्व व अथर्व ग्रुपच्या व्यवस्थापनाचे मार्गदर्शन यामुळे अथर्व-दौलत साखर कारखान्याने सन २०१९ ते २०२५ या काळातील सर्वच गळीत हंगाम यशस्विरित्या पूर्ण केले असून या कालावधीत शेतकऱ्यांची ऊस बिले, तोडणी-वाहतूक बिले, तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर अदा केले आहेत. पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारामुळे शेतकऱ्यांत समाधान आणि विश्वास निर्माण झाला. आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील तेरणी हलकर्णी येथे नवीन गट कार्यालय सुरू केल्यामुळे ऊस नियोजन, तोडणी कार्यक्रम, शेतक-यांची नोंदणी, ऊस विकास कार्यक्रम इत्यादी सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना कारखान्याशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार असून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविणे शक्य होणार आहे. याशिवाय ऊस लागवडीत आधुनिक पद्धतीचा वापर, खत व्यवस्थापन, पाण्याचे शाखशुद्ध नियोजन आणि कीटकनाशकांबाबत जागरूकता निर्माण करून उत्पादनवाढीला हातभार लावण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *