रवळनाथ कॉलनीजवळ बस थांब्यास मंजुरी : आजरा अन्याय निवारण समितीचे यश

रवळनाथ कॉलनीजवळ बस थांब्यास मंजुरी : आजरा अन्याय निवारण समितीचे यश

Loading

आजरा / हसन तकीलदार
येथील रवळनाथ, शिव, आयडीयल कॉलनी येथे बस थांबा व्हावा यासाठी आजरा अन्याय निवारण समिती ने राज्य परिवहन मंडळाला लेखी पत्र दिल्यानुसार बस थांबा सुरु करणेसाठी दि. 6 मे रोजी राज्य परिवहन प्रशिक्षण बसद्वारे पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार रवळनाथ कॉलनीच्या तिट्ट्यावर म्हणजेच भडगावकर वेल्डिंग वर्क्स गांधीनगर रोड या ठिकाणी बस थांबा मंजूर करण्यात आला. आजरा अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे.
समर्थ कॉलनी, रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी तसेच आयडियल कॉलनीतील रहिवाशीयांना सरकारी दवाखाना किंवा आजऱ्याचा स्टँडला जाण्यासाठी अडचण व गैरसोय होती. यासाठी रवळनाथ कॉलनीजवळ विनंती बस थांबा सुरु करण्याबाबत लेखी निवेदन अन्याय निवारण समितीने दिले होते. त्यानुसार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर यांनी लेखी पत्र काढून रवळनाथ कॉलनी तिट्ट्याजवळ बस थांबवून प्रवासी चढउतार करणेबाबत सूचना दिल्या. सूचना रजिस्टरवर स्वाक्षरी घेणेबाबत निर्देश देण्यात आले. याठिकाणी विनंती बस थांबा फलक देऊन योग्य ठिकाणी लावणेस मार्गदर्शन करणेबाबत सूचित करण्यात आले. अन्याय निवारण समितीच्या या विधायक कार्याबद्दल सर्वत्र अन्याय निवारण समितीचे कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *