वासरू संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा

वासरू संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा

Loading

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत १ जून रोजी महत्वकांक्षी उपक्रम

कोल्हापूर : प्रतिनिधी-

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत महत्वकांक्षी असे जातिवंत मादी वासरू संगोपन योजना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबविली जात आहे. या योजनेत नोंद झालेल्या रेड्या/ पाड्यांचे चांगले संगोपन होऊन त्या वेळेत दुधात याव्यात यासाठी दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाच्या निमित्याने रविवार दि.०१/०६/२०२५ इ. रोजी संघाच्या वासरू संगोपन योजने अंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा आयोजित केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. 

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रेड्या / पाड्याना संघामार्फत जंतनिर्मुलनाचे औषध मोफत देण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धा या संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणार आहेत.सदरची स्पर्धा पहिल्या टप्प्यात संघाच्या विभागीय पशुवैद्यकीय केंद्राकडे वासरू संगोपन योजनेतील जास्त नोंदणी झालेल्या कार्यक्षेत्रातील ३५ गावात दि.०१/०६/२०२५ इ.रोजी सकाळी ०९ ते ११ वाजताया वेळेत होणार असून त्यानंतर अशी स्पर्धा प्रत्येक महिन्याला कार्यक्षेत्रातील उर्वरित गावात घेण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वासरांच्या कानात योजनेचा टॅग असणे बंधनकारक आहे. तसेच हि स्पर्धा गावातील सर्व संस्थेसाठी खुली असून ती गावातील सार्वजनिक व सोयीच्या ठिकाणी घेतली जाईल. या स्पर्धा रेडीव पाडीसाठी ० ते ६ महिने व ६.०१ ते १२ महिने अशा दोन वयोगटात होणार असून विजेत्यांना बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन ‘उत्कृष्ट वासरू संगोपन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बक्षीसाची रक्कम अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी प्रत्येक गटासाठी आहेत. याशिवाय सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहेत. तर स्पर्धेबाबत सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात येणार असून गोकुळ संघामार्फत आयोजित केलेल्या या ‘उत्कृष्टवासरू संगोपन’  स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *