‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा निरोप समारंभ उत्साहात

Loading

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शॉर्ट टर्म कोर्स अंतर्गत कार्यक्रम

कोल्हापूर / प्रतिनिधी

अतिग्रे ता. हातकणंगले येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न हाल. प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. सेफ्टी ऑफिसरवर असलेल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचे आवाहन केले. तर इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी केले. ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (ADIS) कोर्सेचे महत्व आणि उपयुक्तता सांगितले. इंडस्ट्रियल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हा कोर्स उपयुक्त असून आपल्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणारा असे ते म्हणाले. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑन जॉब ट्रेनिंग कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे नियोजन विद्यार्थी प्रशांत पांचाळ, सात्विक शिंदे, सूत्रसंचालन दिग्विजय कोपर्डेकर, आभार प्रदर्शन ओमकार पाटील यांनी केले. इंडस्ट्रियल सेफ्टी’ ऑफिसर या पदावर काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या

या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, पॉलिटेक्निक प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. सुजित मोहिते, कोर्सेसचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *