डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ६ विद्यार्थ्यांची ‘ट्रूकोड टेक्नॉलॉजी’ व ‘वेब रोलर’ कंपनीमध्ये निवड

डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ६ विद्यार्थ्यांची ‘ट्रूकोड टेक्नॉलॉजी’ व ‘वेब रोलर’ कंपनीमध्ये निवड

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी –

येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची ‘ट्रूकोड टेक्नॉलॉजी’ व ‘ वेब रोलर’ या दोन कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे यांनी दिली. निवडीमध्ये कु. स्वरूप जाधव, नकुल वडार ‘ट्रूकोड टेक्नॉलॉजी’ या कंपनीमध्ये वार्षिक रुपये ४ ते ६ लाख पॅकेज व कु. ऋषिकेश घोडके, आर्यन पाटील,पियुषा सूर्यवंशी , वृषाली कोकाटे, लिफ्टेक वेब रोलर कंपनी, वार्षिक रुपये२.४ ते ६ लाख पॅकेज या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. या विभागातर्फे सॉफ्ट स्किल, ॲप्टीट्यूड टेस्ट, इंटरव्यू स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासह इतर विषयाचे ट्रेनिंग दिले जाते. यासाठी महाविद्यालयातील व बाहेरील तज्ञ नेमले आहेत. निवडीबद्दल ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ.गोपाळ मूलगुंड महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख व विभाग वार ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

निवडीबद्दल ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ.गोपाळ मूलगुंड महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख व विभाग वार ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *