लक्षण प्रगतीचे की अधोगतीचे? जयसिंगपूरकरात चर्चाच चर्चा
जयसिंगपूर प्रतिनिधी
या शहरात पालिकेने जयसिंगपूरला सिंगापूर बनवण्याचा संकल्प जाहीर करून शहरात सर्वत्र भुयारी गटार योजनेचे काम सुरू करून जवळपास गेली सहा महिन्यापेक्षाही अधिक काळ उलटला असून या शहरातील लक्ष्मी रोडच्या मध्यभागी असणारे भुयारी गटार योजनेचे चेंबर बनवण्यासाठी तयार केलेले खड्डे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही अपघाताचे सापळे बनत आहेत. आज सकाळी साडेसात वाजता एक पादचारी या खड्ड्यात पडून जखमी झाला. आता या शहराला सिंगापूर बनवण्याचे स्वप्न दाखवून नेमकी या शहराची वाटचाल प्रगतीकडे की अधोगतीकडे या प्रश्नाचे उत्तर सध्या नागरिक शोधत आहेत.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर मध्यभागी भुयारी गटार तयार करण्यासाठी प्रथम खोदकाम करण्यात आले. बारा फुटापासून साधारणपणे 40 फुटापर्यंत खोल रस्ते खोदण्यात आले. त्यामध्ये भुयारी गटार योजनेच्या पाईप सुद्धा टाकण्यात आल्या. ठिकठिकाणी चेंबर सुद्धा बांधण्यात आली आहेत. याच कामामधील शेवटचा टप्पा म्हणून सध्या या रस्त्याचे खडीकरण सुरू आहे. डांबरी रस्ता येथे होईल मात्र त्यापूर्वी ठिकठिकाणी खोदलेल्या आणि बांधलेल्या चेंबर्समुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठीही हा अपघाताचा सापळा बनलेला आहे. ठिकठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक अथवा सावधानतेचा इशारा देणारे फलक नसल्यामुळे अजानतेपणी लोक या खड्ड्यात पडत आहेत. आता तक्रार कोणाकडे करण्यासाठी माहिती सुद्धा उपलब्ध नाही. परिणामी या शहराचे सिंगापूर बनण्याचे स्वप्न शहरवासीयांना अधोगतीकडे नेणार अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान याबाबतीत कोणत्याही प्रकारची सूचना पालिकेने केलेली नाही मात्र घर फळा आणि पाणीपट्टी भरण्याच्या सूचना शहरवासीयांना अगदी भोंगा वाजवून दिल्या आहेत हे जनता जाणत आहे.

hw-remosaic: false;
touch: (-1.0, -1.0);
sceneMode: 2;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 172.61665;
aec_lux_index: 0;
albedo: ;
confidence: ;
motionLevel: -1;
weatherinfo: null;
temperature: 42;