प्रशासनाला अन्वेषण लाईव्ह न्युज चा धसका : वृत्त प्रसिद्ध होताच लावले दिशादर्शक फलक

जयसिंगपूर : प्रतिनिधी

या शहराला सिंगापूर बनवण्याचे स्वप्न दाखवून भुयारी गटारी योजनेचे काम चालू केले खरे मात्र या योजनेत रस्त्याच्या केलेल्या खुदाईत आणि त्यानंतर केलेले खडीकरण आणि मुरमीकरण मधोमध पडलेले चेंबरसाठीचे खड्डे लक्षात घेता अन्वेषण लाईव्ह न्यूज ने भुयारी गटर्स चेंबर बनत आहेत अपघाताचे सापळे अशी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी संबंधित चला चे चित्रण केले. मात्र ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनाने धसका घेऊन ठिकठिकाणी काम चालू रस्ता बंद के फलक लावले. सोबतच्या छायाचित्रात फलक लावल्यानंतर चे चित्र दिसत आहे. दरम्यानच्या काळात या मुरमीकरणावर पाणी मारणारा टँकर आला आणि संबंधित दिशादर्शक बोर्ड काढूनही गेला. दुसरे छायाचित्र बोर्ड काढल्यानंतरचे आहे. आता काम प्रगतीपथावर ही अधोगतीपथावर हा संशोधनाचा विषय असून नेमकं या शहराचं करायचं काय ठरवलं हे जनता विचारत आहे.