दीप पब्लिक स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन समारंभ उत्साहात संपन्न

दीप पब्लिक स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन समारंभ उत्साहात संपन्न

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील राजश्री फाउंडेशन्स संचलित दीप पब्लिक स्कूल जय येथे मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी (बालवाडी) विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संदीप रायन्नावार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी “माझा शिकण्याचा प्रवास” या उपक्रमांतर्गत शाळेत त्यांनी काय शिकले आणि शाळेबद्दल त्यांना काय आवडते हे आत्मविश्वासाने मांडले. लहानग्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
यानंतर विद्यार्थ्यांना पदवीप्रदान (ग्रॅज्युएशन) करून प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने ग्रॅज्युएशन कॅप उंचावत आपल्या यशाचा आनंद साजरा केला.

प्राचार्या सौ.नमिता जैन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षक व पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ.विजयराज मगदूम व उपाध्यक्ष ॲड.डॉ.सोनाली मगदूम याचे मार्गदर्शन लाभले.