जयसिंगपूर : प्रतिनिधी

चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफैक्चरिंग असोशिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग नवव्यांदा फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्ली मधील प्रगती मैदान येथे दि .13 मार्च 2026 रोजी आयोजीत केलेल्या संस्थेच्या 40 व्या वार्षिक संमेलनामध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली.परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.एच.के.बत्रा यांची असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. यावेळी संपुर्ण भारतातील सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित होते,
श्री गणेश बेकरी नांदणी प्रा. लि. व चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या औद्योगीक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
यावेळी गणेश बेकरी नांदणी च्या सेल्स कार्पोरेट हेड ऋतुजा चकोते व कार्पोरेट हेड अभिषेक चकोते यांनी या वार्षिक संमेलनामध्ये ‘गणेश बेकरी नांदणी’ कडून प्रतिनिधीत्व केले. व्यवसायात नव्या पिढीचे ते नेतृत्व करित आहेत. अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकीत्सक वृत्ती व सखोल अभ्यास यामुळे या बेकरी व्यवसायात आपला ठसा उमठाविला आहे.
संमेलनामध्ये बेकरी व्यवसाय वाढीसाठी विविध विषयावर मंथन करणेत आले.आखाती युध्दाचे व्यवसायावर होणारे दुष्परिणाम,नवीन टेक्नॉलॉजी, जागतीक स्पर्धा, शासनाचे विविध नियम, भारतीय बाजारपेठेमधील बेकरी उत्पादनाविषयी ग्राहकांच्या मध्ये जागरुकता निर्माण करणे आदी विषयावर विचार विनिमय करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय बेकरी उद्योगामधील बहुमोल योगदानाबद्दल स्व.राम अवतार गुप्ता यांना मरणोत्तर लाईफ टाईम अवार्ड (2025-26) प्रदान करणेत आला. त्यांचे सुपुत्र शिव कुमार गुप्ता (कार्यकारी संचालक,आशा राम ऍन्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड) यांनी परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सोनिक बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड चे कार्यकारी संचालक गिरीश मतलानी व विशेष अतिथी म्हणून वजन मापन,ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय,भारत सरकारचे संचालक श्री आशुतोष अग्रवाल हे उपस्थित होते.
यावेळी ऑल इंडीया ब्रेड मैन्युफॅक्चरींग असोशिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो (किट्टी ब्रेड) नवनिर्वाचीत अध्यक्ष एच.के. बत्रा ( परफेक्ट ब्रेड) उपाध्यक्ष अरविंद सिंघल (ब्रिटानिया इंडस्ट्रीज) शिवकुमार गुप्ता ( आशा राम & सन्स ) ट्रेझरर संदीप आहुजा ( मिल्कमेड) आदी मान्यवर व देशभरातील बेकरी व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
