![]()
आजरा / हसन तकीलदार
आजरा गावाचे ऐतिहासिक संदर्भ अगदी शिलाहार काळापासून दिसून येतात. मध्यंतरी फर्ग्युसन कॉलेज मधील एका विद्यार्थीनीने अगदी येथे अश्मयुगातील शस्त्रे ही शोधली होती. निसर्गाने समृद्ध हा परिसर तरी ही ऐतिहासिक वास्तु तशा आपल्याला कमीच लाभलेत. आजरा तालुक्यात फारच मोजक्या ऐतिहासिक वास्तू आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. रोहन जाधव यांनी केले. ऐतिहासिक वास्तूंचे पतन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रामतीर्थ येथील मंदिरे, व्यंकटराव हायस्कूल , जुने कोर्ट, जुनी तहसील व पोलीस स्टेशनची इमारत आणि काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वास्तू सोडल्या तर तसा ऐतिहासिक वारसा कमीच लाभला आहे. त्यात रामतीर्थच्या जंगालात असणारी छोटी गढी (चौकी) आशा काही वास्तू फक्त पुस्तकात नोंदी पुरत्याच उरल्या आहेत. अशी जाणव ही त्यांनी करून दिली.
1886 पासून साधारण 136 वर्षां पेक्षा जास्त वर्ष नैसर्गिक आणि अलीकडील मानवी आघात सोसत, जोमाने उभा असलेले , प्रत्येक आजरेकराच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेले, अनेकांच्या बालपणीच्या आठवणी तेवत ठेवणारे ऐतिहासिक व्हिक्टोरिया पूल आज मात्र सरकारी अनास्थेचा व दुर्लक्षाचा बळी पडून असहाय्य होउन शेवटच्या घटका मोजत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.
प्रशासकीय यंत्रणा मात्र जबाबदारी एकमेकांवर ढकला ढकली करून आपले हात वर करीत आहे. लोकप्रतिनिधींचे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुळे पूल शेवटची घटका मोजत आहे, असा आरोपही डॉक्टर जाधव यांनी केला.
पाश्चिमात्य देशांच्या सारखा ऐतिहासिक वास्तू जपण्याचा दृष्टीकोण आपल्याकडे नसला तरी किंवा काही कारणांमुळे जुना पुल सांभाळने शक्य नसले तरी गरज सरो वैद्य मरो असे करून चालणार नाही. असे डॉक्टर जाधव म्हणाले.
सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार , जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी ,बांधकाम विभागाचे आधिकारी, नॅशनल हायवे ॲथोरीटी चे आधिकारी, संबंधित कंपनीचे आधिकारी आणि सुज्ञ नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखून योग्य पावले उचलावित. तसे आदेश द्यावेत आणि यावर उचित उपाययोजना आखणे गरजेचे आहे. केवळ विक्टोरिया पुलच नव्हे तर व्यंकटराव हायस्कुलची जुनी इमारत, आजरा तहसील व पुलिस स्टेशनची जुनी इमारत अशा ज्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जुन्या ऐतिहासिक ब्रिटिश कालीन वास्तू आहे त्यांचे संवर्धन करून त्या जतन करणे गरजेचे आहे. पुरातत्व खात्याने याकडे लक्ष घालून या पुलाच्या दोन्ही बाजूने बगीचा करून पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई केली तर आजऱ्याच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढेल. असे सुचित करून आजरेवासियांना विरंगुळ्यासाठी एक उद्यान होईल आणि निसर्गाच्या सौंदर्याचा लाभ घेता येईल. असे ते म्हणाले. पुरातत्व खाते, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधिनी याकडे लक्ष द्यावे व योजना आखून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


