ई सेवा केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर

ई सेवा केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर

Loading

ज्यादा रक्कम आकारणे यासह गैरप्रकाराला आळा घालणार!

शिरोळ : प्रतिनिधी

रेशनकार्ड संबंधी विविध कामासाठी अवाजवी रक्कम आकारणाऱ्या ई सेवा केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिरोळ तहसीलदार यांनी कार्यकर्त्यांना दिले. ही सेवा केंद्रांवर प्रशासनाची आता करडी नजर असणार आहे. रेशन कार्ड संबंधी विविध कामासाठी अवास्तव कर आकारणी करणे यासह विविध गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न शिरोळ तालुका प्रशासन करणार आहे.
१२ अंकी नवीन रेशन कार्ड व रेशन कार्ड विभक्त करणे या कामासाठी शासनाने नियुक्त केलेल्या महा-ई-सेवा केंद्राकडून पंधराशे ते तीन हजार रुपये इतकी अवास्तव रक्कम घेतली जात असल्याची लेखी तक्रार अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे माजी अध्यक्ष विजयकुमार चौगुले व माजी कार्याध्यक्ष सुदर्शन कदम यांनी केली होती. तहसीलदार श्री. अनिलकुमार हेळकर यांना भेटून तसे निवेदन सुद्धा दिले.

त्या अनुषंगाने त्यावेळी तहसीलदार यांनी शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अशी अवाजवी रक्कम घेणाऱ्या ई सेवा केंद्रांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुरवठा निरीक्षक सौ. वैशाली माळी यांना अशा ई सेवा केंद्रांची तक्रार आल्यास त्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. प्रसंगी असे गैरप्रकार करणाऱ्या ई सेवा केंद्रांचे लायसन रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी कांतिनाथ चौगुले उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *