उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन

उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन

Loading

दौलत अथर्व कारखाना कार्यस्थळावर 9 मे रोजी कार्यशाळा : रोलर पूजन सुद्धा याच दिवशी

चंदगड / तातोबा गावडा

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थातच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी दौलत-अथर्व कारखाना कार्यस्थळावर कृत्रीम तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिक परिसंवाद दि. ९ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला असून दौलत अथर्व कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या परिसंवादाला उपस्थित राहण्याचे आवाहन दौलत अथर्वचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यानी केले आहे. यावेळी गळीत हंगाम 2025-26 करिता रोलर पूजनाचा कार्यक्रम देखिल करणार असल्याचे श्री मराठे यांनी सांगितले.
या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत-अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे असतील तर बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ञ डॉक्टर विवेक भोईटे हे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कोणत्या पद्धतीने करून पीक उत्पन्न वाढ कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

गेली बरीच वर्षे बंद असलेला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण चालवायला घेतला तो सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे चालवत आहे व इथून पुढे देखील यापेक्षा योग्य पद्धतीने आपण चालवणार असून यासाठी मुख्य घटक हा शेतकरी असून त्याच्या शेतीमध्ये एकरी उत्पादन जास्तीत कशी वाढ होईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे दौलत-अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी अन्वेषण लाईव्ह न्युजशी बोलताना सांगितले.

या संयुक्त कार्यक्रमाला तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती घ्यावी असे आवाहन संचालक विजय पाटील यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *