आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी

आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी

Loading

जयसिंगपूर पोलीस प्रशासनाकडून ताफ्यासह विशेष पेट्रोलिंग

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी, यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. राजीव गांधी नगर,यादव नगर,संभाजीनगर, शाहूनगर, 52 झोपडपट्टी,गल्ली क्रमांक 01 ते 09, शिवशक्ती कॉलनी,हेरवाडे कॉलनी, दत्तनगर, दीपनगर तसेच गल्ली क्रमांक 10 ते 16 परिसरात पोलीस ठाणे येथील दोन सरकारी चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह विशेष पेट्रोलिंग करण्यात आले.

या पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांना माईकद्वारे सूचना देत आदर्श आचारसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना कोणत्याही समाज,धर्म किंवा व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.आक्षेपार्ह किंवा भडकाऊ पोस्ट टाळाव्यात,तसेच कोणताही संशयास्पद किंवा चुकीचा प्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा,असेही नागरिकांना कळविण्यात आले.

सदर पेट्रोलिंग मोहिमेत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांच्यासह पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि होमगार्ड उपस्थित होते.