जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रभाग 13 मधून अपक्ष उमेदवार जॉन सकटे यांनी फिरवली राजकीय समीकरणे

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर नगर परिषद निवडणुक सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 13 मध्ये चुरस वाढली असून शिरोळ तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीचे अध्यक्ष दिवंगत लक्ष्मण सकटे यांचे चिरंजीव जॉन सकटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.प्रभागातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. लक्ष्मण सकटे यांनी या प्रभागातून नशीब अजमावले पण त्यांना यश आले नाही.पण विजयी होऊन वडिलांना श्रद्धांजली अर्पण करायची असा चंग जॉन यांनी मनाशी बाळगला आहे.सकटे यांनी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य जयंती सुरु करून मुहूर्तमेढ रोवली.सकटे यांच्या अकाली निधनानं ही परंपरा खंडित पडते की काय अशी चर्चा चौकात चालू होती.पण वडिलांचा संघर्ष घेऊन सामाजिक कार्य पुढे घेऊन चाललेले जॉन सकटे यांनी जयंतीची परंपरा खंडित होऊ दिली नाही.

जॉन सकटे यांच्या धाडशी व मितभाषी स्वभावामुळे समाजातील सर्व घटकांशी स्नेहपूर्ण नातं राखत त्यांनी लक्ष्मण सकटे यांच्या निधना नंतर सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच स्वभावाच्या जोरावर दोन दिवसात राजकीय समीकरणच बदलून टाकले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जॉन सकटे हे राजकारणात केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी उतरल्याचे त्यांच्या प्रचारातून स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभागातील रस्ते,पाणीपुरवठा,महिला बचतगटांचे प्रश्न,नागरिक सुविधा आणि स्वच्छता या मुद्द्यांची जाण असल्याने एक सक्षम नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.परिसरातील नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.त्यामुळेच घराघरातून त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात प्रचारात सहभागी होत असून प्रभागात शिस्तबद्ध आणि सकारात्मक प्रचार सुरू आहे.जॉन यांचा साधेपणा, लोकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची पद्धत आणि काम करण्याची तयारी यामुळे अनेक मतदार त्यांना आपल्या प्रभागासाठी योग्य पर्याय मानत आहेत.मी राजकारणात येण्यामागचा हेतू केवळ प्रभागातील समस्या सोडवणे हा आहे.माझ्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन,असा विश्वास जॉन यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला.युवकांपासून महिलांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. निवडणूक जवळ येत असताना प्रभाग 13 मध्ये वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. मतदारांशी नाळ जुळवणाऱ्या आणि विकासाचा प्रामाणिक रोडमॅप मांडणारे जॉन सकटे या निवडणुकीत महत्त्वाचे स्पर्धक ठरत आहेत.जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग 13 मधील लढत अधिकच रोचक बनली आहे.