![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
विरोधकांनी कितीही बिन बुडाचे आरोप केले तरीही यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे शहराचा विकास. माझ्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच शिरोळ तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे यापुढेही जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवणे गरजेचे आहे असे मत शेतकरी नेते भाजपाचे पदाधिकारी सावकर मादनाईक यांनी मांडले.
जयसिंगपूर येथील आयोजित प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते. राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर, प्रभाग ६ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार महेश कलकुटणी, स्वाती मादनाईक यांनी मतदारांची संवाद साधला. यावेळी या प्रभागातील मतदारांनी उमेदवारांची स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना सावकार मादनाईक पुढे म्हणाले, जयसिंगपूर शहरात मोठ्या प्रमाण विकासकामे झाली आहेत. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य आगमन, शहरातील भुयारी गटार योजना, विविध सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची भाव्य इमारत, शहरातील पथदिवे, स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा यासह विविध विकासकामांच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रत्येक जनतेबरोबर नाळ जोडली आहे. सध्या नगरपालिकेची निवडणूक सुरू असल्याने विरोधक बिन बुडाचे आरोप करीत आहेत त्यात काहीही तथ्य नाही, उलट शहराचा विकास करायचा असेल तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर म्हणाले, शहरातील मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामाबरोबर गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी धारकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे. २०० हून अधिक झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड दिले आहे या पुढील काळात उर्वरित झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावणार आहे, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि स्वप्नातील घरे मिळवून आम्ही दिली आहेत. यापुढेही शहरातील सर्वच प्रश्नांसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी काम करेल, असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार फेरीत अनिल बागणे, मिलिंद भिडे, रमेश यळकुडकर, शिवाजी कुंभार, प्रवीण इंगळे, अमर खाडे, तेजस कुऱ्हाडे, गणेश तावडे, सुजित दानोळी, शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

