![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
बुधवार दि. 22 रोजी रात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास येथील 13 व्या गल्लीत सुनिल किसन पाथरवट याचा चाकूचे वार करून खून प्रकरणी शहरातील 6 संशयितांवर जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून जुन्या वादाच्या कारणातून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिस कळवितात.संजय पाथरवट,रोहित पाथरवट, शिवानंद पाथरवट,शेखर पाथरवट,सागर कलगुटगी, विजय पाथरवट सर्वजण रा. जयसिंगपूर गल्ली नंबर 13 अशी संशयितांची नावे आहेत. तर या प्रकरणी विशाल शिवाजी पवार रा. गल्ली नंबर 13 यांनी फिर्याद दिली असून 384/2025 भ्रा.न्या.सं. 2023 चे कलम 103(1), 46, 189(2),189(4),191(1),191(2), 191(3), नुसार गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत अधिक मिळाली माहिती अशी कि, यातील फिर्यादी, मयत व आरोपीत क्रमांक 1 ते 6 हे एकाच भागात राहणारे आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. वरील तारखेस वेळी व ठिकाणी जुने वादाच्या कारणांवरुन आरोपी क्रमांक 6 संजय पाथरवट यांने मयत सुनिल पाथरवट यास लाथाबुक्यानी मारहाण करुन ह्यो रांडचा गल्लीतील नेता व्हायलाय, ह्याला आता जिवंत सोडु नका अशी चितवाणी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी क्रमांक 4 रोहीत राजु पाथरवट आरोपी क्रमांक 5 शिवानंद पाथरवट, यांनी त्याला गच्च धरुन ठेवल्याने आरोपी क्रमांक 1 शेखर पाथरवट, आरोपी क्रमांक 2 सागर कलगुटगी, आरोपी क्रमांक 3 विजय उर्फ पाथरवट, यांनी सर्वानी शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन सुनिल पाथरवट याचे पोटात,व अंगावर चाकुने मारुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुनील पाथरवट याचा मृत्यू झाला. त्याचा खुन केले बाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी ही फिर्याद दाखल करून ते पुढील तपास करीत आहेत.

