आजरा -हाजगोळी बंधाऱ्यावरून रहदारी ठप्प

Loading

दीड महिना उलटून गेला तरीही दुरुस्ती डागडुजी नाही

बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक रोलिंग बसवून उंची वाढवणे गरजेचे ; डॉ.रोहन जाधव यांची मागणी 

आजरा:हसन तकीलदार-

आजरा -हाजगोळी बंधाऱ्यावरील स्लॅबच्या लोखंडी सळ्या दिसत होत्या, त्यावेळीच जर दुरुस्ती झाली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती.अशी खंत व्यक्त करीत एकते दीड महिना उलटून गेला तरीही बंधाऱ्याची दुरुस्ती अथवा डागडुगी झालेली नाही,कि याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही असा आरोप करून बंधाऱ्यांवर मोठा खड्डा पडला असल्यामुळे तेथील वाहतूक तात्पुरती बंद असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक रोलिंग बसवून उंची वाढवावी अशी मागणी डॉ.रोहन जाधव यांनी केली.भगदाड मुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा या ठिकाणी कायम स्वरूपी उपाय योजना आखावी असेही त्यांनी सांगितले. 
आजपर्यंत यावर जुजबी आणि मलमपट्टी करण्याचे काम झाले आहे. कायम स्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.बंधाऱ्यावरून मल्टी एक्सेल ट्रक जे 25 ते 30 टनापेक्षा जास्त वजनाची माल वाहतूक करतात यावर प्रतिबंध घालणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे.नाहीतर बंधाऱ्याच्या मूळ पायाला नुकसान पोहचून बंधारा पडण्याची शक्यता आहे असे जाणकारांचे मत आहे. याच बंधाऱ्यावरून प्रवासी वाहने,माल वाहक,एस.टी.,इत्यादी
ची रोजची येजा सुरु असते. रस्ता अरुंद व कमी उंचीचा असल्यामुळे येथून प्रवास करणे धोक्याचे आहे. 
हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी खुर्द बंधाऱ्यावरून हाजगोळी खुर्द,हाजगोळी बुद्रुक,पेद्रेवाडी,कोवाडे,सरोळी,निंगुडगे,ऐनापूर या गावाना मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक तालुक्याच्या ठिकाणी होत असते.1997 साली बांधकाम झालेल्या या बांधाऱ्याला दरवर्षी पुरामध्ये धोका निर्माण होत असतो.बऱ्याचवेळा येथील भराव वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *