![]()
ई.लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी : रु.०३ लाख हून अधिक पॅकेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथीलडॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ५५ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर कनेक्ट,पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठीनिवड झाली असून क्यूस्पायडर ही एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे.उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर ही कंपनी लक्ष केंद्रित करते. जगात विविध ठिकाणी कंपनीची केंद्रे असून जागतिक पातळीवरती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये कंपनी अग्रेसर आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रु.०३ लाख हून अधिक पॅकेज देऊ केले आहे. अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली.कॉम्पुटर विभाग १०,एम सी ए ०२, आय.टी.१६,ए.आय.डी.एस.१३ व ई.टी.सी.१४ अशा एकूण ५५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली असून एप्टीट्यूड टेस्ट,ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम,व्हॉइस चेअरपर्सन एड. डॉ.सोनाली मगदूम,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ.सुनीलआडमुठे, प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सौरभ खानावळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले.